Sunita Ahuja : सुनीता आहुजाचे लटके-झटके, 13 वर्ष लहान अभिनेत्यासोबत केला डान्स; एनर्जेटिक VIDEO VIRAL
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Sunita Ahuja : बॉलिवूडमध्ये एका गाण्याने सध्या धूम माजवली आहे. "बिजुरिया" नावाचे हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच त्यावर रील्स बनवत आहेत.
मुंबई : बॉलिवूडमध्ये एका गाण्याने सध्या धूम माजवली आहे. "बिजुरिया" नावाचे हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच त्यावर रील्स बनवत आहेत. आता या गाण्यावर एक खास व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. सुनीता आहुजा या ट्रेंडिंग गाण्यावर थिरकल्या आहेत.
अभिनेता मनीष पॉल आणि दिग्गज अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांचा हा डान्स व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. दोघांनी मिळून "बिजुरिया" गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे. मनीष पॉल स्टायलिश पोशाखात दिसत आहे तर सुनीता आहुजा पारंपरिक सलवार सूटमध्ये दिसली.
advertisement
हा व्हिडिओ मनीषने इन्स्टाग्रामवर पोस्ट करताच लगेच व्हायरल झाला. अनेक सेलिब्रिटींनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. अभिनेता वरुण धवनने सुनीता आहुजाला "लहानपणापासून माझ्या जवळची व्यक्ती" म्हणत प्रेमळ कमेंट केली. आरती सिंग, आरजे अनमोल आणि इतर अनेकांनीही सुनीताच्या एनर्जीचे कौतुक केले. चाहत्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या. काहींनी तिला गोविंदापेक्षा चांगली डान्सर म्हटले, तर काहींनी तिच्या वयातही असा डान्स पाहून आश्चर्य व्यक्त केले.
advertisement
advertisement
"बिजुरिया" हे गाणे "सनी संस्कार की तुलसी कुमारी" या धर्मा प्रॉडक्शनच्या आगामी चित्रपटातील आहे. शशांक खेतान दिग्दर्शित हा सिनेमा 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. गाणे सोनू निगम आणि असीस कौर यांनी गायले आहे, तर संगीत तनिष्क बागची आणि रवी पवार यांनी दिले आहे. गाण्याचे बोल तनिष्क बागची आणि सोनू निगम यांनी लिहिले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 5:30 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Sunita Ahuja : सुनीता आहुजाचे लटके-झटके, 13 वर्ष लहान अभिनेत्यासोबत केला डान्स; एनर्जेटिक VIDEO VIRAL