TMKOC: 'तारक मेहता' मध्ये पुन्हा ट्विस्ट, EX कलाकार परत येणार? 'त्या' VIDEO ने भुवया उंचावल्या
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
TMKOC: वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेबद्दल पुन्हा एकदा एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
मुंबई | वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेबद्दल पुन्हा एकदा एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मालिकेतील एक्स कलाकार पुन्हा शोमध्ये येणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. एका व्हिडीओने सध्या ही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. हा व्हिडीओ नेमका काय आहे? याविषयी जाणून घेऊया.
मालिकेतील माजी अभिनेता गुरुचरण सिंग, ज्यांनी रोशन सोढीची भूमिका साकारून लाखो चाहत्यांच्या मनात घर केले होते, ते पुन्हा अभिनयात परतणार असल्याचे संकेत त्यांनी स्वतः दिले आहेत.
बराच काळ अभिनयापासून दूर राहिलेल्या गुरुचरण सिंगने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, "मी खूप दिवसांनी तुम्हा सर्वांसमोर आलो आहे. बाबाजींनी माझ्या, माझ्या कुटुंबाच्या आणि तुमच्या सर्व चाहत्यांच्या प्रार्थना ऐकल्या आहेत. माझ्याकडे एक खूप चांगली बातमी आहे, जी मी लवकरच शेअर करणार आहे.” त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी कमेंट करत विचारलं आहे “सोधी परत येणार का?”
advertisement
गुरुचरण सिंगने काही वर्षांपूर्वी अचानक अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. एप्रिल 2024 मध्ये ते काही दिवस बेपत्ता झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर त्यांनी सांगितले की ते आध्यात्मिक प्रवासावर गेले होते. त्यानंतर त्यांच्या आरोग्याबाबत आणि आर्थिक अडचणींबाबतही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, आता त्यांच्या ताज्या पोस्टने चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
advertisement
advertisement
दरम्यान,‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचा गेल्या काही महिन्यांपासून वादांमुळे चर्चेत राहिलेला काळ असून, अशा वेळी गुरुचरणचा परतावा शोसाठी नवा श्वास ठरू शकतो. त्यांच्या पुनरागमनाबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरीही चाहत्यांना पुन्हा “सोढी”च्या जोरदार एन्ट्रीची आतुरता लागली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 10, 2025 1:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
TMKOC: 'तारक मेहता' मध्ये पुन्हा ट्विस्ट, EX कलाकार परत येणार? 'त्या' VIDEO ने भुवया उंचावल्या








