'लवकरच भेटूया...' मालिका सुरू होण्याआधीच तेजश्री प्रधानने सांगितलं मालिकेतील नाव, कधीपासून पाहता येणार?

Last Updated:

Tejashree Pradhan : तेजश्री प्रधान 'झी मराठी'वरील 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुबोध भावे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. मालिकेचं प्रमोशन जोरात सुरू आहे.

News18
News18
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिका आणि चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत, आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिच्या आगामी मालिकेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

तेजश्रीचं 'झी मराठी'वर 'कमबॅक'!

तेजश्री प्रधान आता 'झी मराठी' वाहिनीवरील आगामी 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यात तिच्यासोबत लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकेचं प्रमोशन सध्या जोरात सुरू असून, याच निमित्ताने तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही खास फोटो आणि एक भावनिक कॅप्शन शेअर केलं आहे.
advertisement

"तुमच्या मनात 'जागा' निर्माण करायला सज्ज!" - तेजश्रीची पोस्ट

तेजश्रीने मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती एका बस स्टॉपवर बसलेली दिसतेय. या फोटोंसोबत तिने एक हृदयस्पर्शी संदेश लिहिला आहे: "ज्या जागांनी तुमच्या मनात माझ्यासाठी जागा निर्माण केली, त्या जागी जाऊन पुन्हा एकदा तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या आठवणींना जाग आली... सज्ज झालेय पुन्हा एकदा तुमच्या मनात तिची 'जागा' निर्माण करायला, एक नवीन पात्र, नव्या उमेदीने जगायला लवकरच भेटूया 'स्वानंदी सरपोतदारला'... आशीर्वाद असू द्या." तिच्या या पोस्टने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे, कारण तिने तिच्या नव्या भूमिकेचं नावही यात उघड केलं आहे.
advertisement
advertisement
'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असली तरी, अद्याप प्रदर्शनाची नेमकी तारीख जाहीर झालेली नाही. सुबोध आणि तेजश्री यांच्याव्यतिरिक्त मालिकेत आणखी कोणते कलाकार असणार, हे पाहणंही रंजक ठरेल.

'होणार सून...' ते 'प्रेमाची गोष्ट' तेजश्रीचा यशस्वी प्रवास

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेद्वारे तेजश्री 'झी मराठी'वर पुन्हा एकदा परतणार आहे. याआधी तिने याच वाहिनीवरील 'अगं बाई सासुबाई' आणि 'होणार सून मी ह्या घरची' या प्रचंड गाजलेल्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या, ज्यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'लवकरच भेटूया...' मालिका सुरू होण्याआधीच तेजश्री प्रधानने सांगितलं मालिकेतील नाव, कधीपासून पाहता येणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement