advertisement

मुलींच्या आयुष्यात बापाचं फार महत्त्व असतं! 'तिघी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर, पाहून डोळ्यात पाणी येईल

Last Updated:

आई-मुलींचं नातं हे शब्दांत मांडणं कठीण… कधी जिव्हाळ्याने भरलेलं, कधी मतभेदांनी दुरावलेलं... तरीही एकमेकांशी घट्ट जोडलेलं. अशाच गुंतागुंतीच्या, हळव्या आणि वास्तववादी नात्याचा वेध घेणारा हा सिनेमा असून सिनेमाचा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

News18
News18
भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे यांच्या तिघी या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून खूप चर्चा आहे. हा सिनेमा नेमका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. सिनेमाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला असून तो पाहून डोळ्यात पाणी येईल.
आई-मुलींचं नातं हे शब्दांत मांडणं कठीण… कधी जिव्हाळ्याने भरलेलं, कधी मतभेदांनी दुरावलेलं... तरीही एकमेकांशी घट्ट जोडलेलं. अशाच गुंतागुंतीच्या, हळव्या आणि वास्तववादी नात्याचा वेध घेणारा हा सिनेमा असून सिनेमाचा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
advertisement
2 मिनिटं 14  सेकांदाच्या ट्रेलरमध्ये एका घरातल्या तीन स्त्रियांचं आयुष्य अधिक ठळकपणे उलगडताना दिसतं. आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील मतभेद, छोट्या-मोठ्या भांडणांतून व्यक्त होणारा राग, न बोललेल्या अपेक्षा आणि तरीही प्रत्येक क्षणी जाणवणारा जिव्हाळा या सगळ्याचं प्रभावी चित्रण यात पाहायला मिळतं. तिघींच्या आयुष्यात वेगवेगळे संघर्ष आहेत. प्रत्येक जण स्वतःच्या प्रश्नांशी झुंज देताना दिसतेय. मात्र आयुष्याच्या एका निर्णायक वळणावर त्या तिघी एकमेकींसाठी कशा उभ्या राहाणार, याची उत्सुकता ट्रेलर शेवटपर्यंत टिकवून ठेवतो.
advertisement
‘आईचं घर. हजार आठवणी.’ ही टॅगलाईन ट्रेलरमध्येही ठळकपणे जाणवते. घर हे फक्त चार भिंतींचं नसून तिथे साठलेल्या आठवणी, तुटलेले संवाद आणि पुन्हा जुळणारे धागे यांचं प्रतीक ठरतं. तिघींच्या नात्यातील ताणतणाव आणि त्यामागची माया यांचा समतोल साधत हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणार आहे.
advertisement
या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ची कथा व दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केलं आहे. निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे.
आई-मुलींच्या नात्याकडे संवेदनशील आणि प्रगल्भ दृष्टीकोनातून पाहाणारा 'तिघी' हा सिनेमा येत्या 6 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
मुलींच्या आयुष्यात बापाचं फार महत्त्व असतं! 'तिघी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर, पाहून डोळ्यात पाणी येईल
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement