advertisement

महाराष्ट्रात आहे 'तुंबाड', जिथे खरंच दडलाय खजिना, त्याच रहस्यमयी ठिकाणी झालंय शुटींग, पण कुठे?

Last Updated:

'तुंबाड' हा सिनेमा 13 सप्टेंबरपासून रि-रिलीज झाला आहे. सिनेमा जितका हॉरर आहे तितकंच सिनेमाचं शुटींग लोकेशनही हॉरर आहे. कुठे शुट केला आहे तुंबाड हा सिनेमा माहितीये? कोकण रेल्वेनं थेट त्या गावात जाता येतं.

तुंबाड फिल्मचे लोकेशन
तुंबाड फिल्मचे लोकेशन
मुंबई : सध्या काही वर्षांपूर्वी रिलीज झालेले चित्रपट पुन्हा रिलीज करण्याचा ट्रेंड आला आहे. काही दिवसांपूर्वी 'रहना हैं तेरे दिल में' हा चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा रिलीज करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता कल्ट हॉरर चित्रपट 'तुंबाड' देखील रि-रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 13 सप्टेंबरपासून हा चित्रपट थिएटरमध्ये बघायला मिळणार आहे. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला होता. राही अनिल बर्वे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे तर सोहम शहा, आनंद एल. राय, मुकेश शहा आणि अमिता शहा हे निर्माते आहेत. हा चित्रपट जितका गूढ आणि भीतीदायक आहे तितकीच त्याची शुटिंग लोकेशन्स देखील गूढ आहेत.
माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार, या चित्रपटाच्या शुटिंगसाठी निर्माते अशा जागेच्या शोधात होते जी मूळातच गूढ असेल. तुंबाडच्या शुटिंगसाठी त्यांनी अशी ठिकाणं, स्थान निवडली जिथे या पूर्वी कोणीही शुटिंग करण्याचा विचार केला नव्हता. या चित्रपटाचं काही शुटिंग महाराष्ट्रातील तुंबाड गावात झालं आहे. हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. या गावाबाबत अनेक उलटसुलट कथा प्रसिद्ध आहेत. तुंबाड गावात खजिना (गुप्तधन) पुरला असल्याचा स्थानिकांना विश्वास आहे. पण, हा खजिना कुठे आहे, याची कोणालाच कल्पना नाही. गावातील काही रहिवासी गुप्तधनाबद्दल बोलायलाही घाबरतात. चित्रपटात मुसळधार पावसाचे काही सीन्स आहेत. तुंबाड गावात प्रत्यक्षात देखील असाच मुसळधार पाऊस पडतो.
advertisement
कोकण रेल्वेने तुंबाड या गावात जाता येतं. अंजनी हे तुंबाडपासून सर्वात जवळ असलेलं रेल्वे स्टेशन (8 किलोमीटर) आहे. जर तुम्ही रस्त्याने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर मुंबई-गोवा हायवेचा वापर करावा लागेल.
तुंबाड चित्रपटामध्ये एक मोठा वाडा दाखवण्यात आला आहे. हा वाडा प्रत्यक्षात अस्तित्वात आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये हा वाडा आहे. 1703 मध्ये सरदार अंबाजी पुरंदरे यांच्यासाठी त्याची बांधणी झाली होती. हे ठिकाण बघण्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. या बंगल्यात एक गणपती मंदिर देखील आहे. चित्रपटाचं इतर शुटिंग पालघर, महाबळेश्वरसारख्या ठिकाणी झालं आहे. महाबळेश्वर हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
महाराष्ट्रात आहे 'तुंबाड', जिथे खरंच दडलाय खजिना, त्याच रहस्यमयी ठिकाणी झालंय शुटींग, पण कुठे?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement