तलवारीवर लटकता मृतदेह, मुलगा आईला...; 'देवरा'च्या त्या सीनवर रिलीज आधीच कात्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
devara part one iolenc scene cut : देवरा सिनेमा मागील काही महिन्यांपासून चर्चेत आहे. त्याचा ट्रेलर रिलीज झाला. मात्र सिनेमा रिलीजच्या आधी त्यातील काही सीनला कात्री लागली आहे.
मुंबई : सुपरस्टार ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान यांच्या बहुप्रतिक्षित 'देवरा - पार्ट 1' या चित्रपटाचा ट्रेलर दोन दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट 27 सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कोरटाला सिवा यांनी केले आहे. चित्रपटाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे निर्माते आणि कलाकार खूप खूश आहेत, पण काहीशी निराशाही होईल. CBFC ने त्यात 4 कट लावले आहेत. यातील तीन कट हे हिंसाचाराशी संबंधित आहेत आणि चौथा कट सीजीआयशी संबंधित आहे. CBFC चे कथित प्रमाणपत्रही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
निर्मात्यांनी 'देवरा पार्ट 1' च्या सेन्सॉरशिपची औपचारिकता पूर्ण केली आहे. चित्रपटाला UA प्रमाणपत्र मिळाले आहे. सेन्सॉरचा अहवाल आला असून CBFC ने चित्रपटात चार कट सुचवले होते. सुचविलेल्या कटांपैकी तीन कट हे हिंसक स्वरूपाचे होते, तर चौथा कट हा शार्कच्या दृश्यासाठी स्क्रीनवर CGI मार्क टाकण्याबाबत होता. CBFC च्या सूचनेनंतर निर्मात्यांनी हे तीन सीन काढून CGI मार्क लावले आहेत.
advertisement
123 Telugu.com नुसार, हिंसक दृश्यांमध्ये एक व्यक्ती आपल्या पत्नीला लाथ मारत आहे, एका माणसाचा मृतदेह तलवारीवर टांगलेला आहे आणि मुलगा त्याच्या आईला लाथ मारतो आहे. ही दृश्ये प्रभावशाली मानून निर्मात्यांनी हे दृश्य थोडे बदल करून ठेवले आहेत. या सुधारणांनंतर, देवराचा नवीन रनटाइम अंदाजे 177 मिनिटे 58 सेकंद आहे.
advertisement
'देवरा पार्ट 1'मध्ये सैफ अली खानची धडाकेबाज स्टाईल
जान्हवी कपूर या मेगाबजेट चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. ती पहिल्यांदाच सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत काम करत आहे. चित्रपटाची 2 गाणी रिलीज झाली आहेत, ज्यात एनटीआर आणि जान्हवीची केमिस्ट्री पाहायला मिळते. या चित्रपटात सैफ अली खान नकारात्मक भूमिकेत आहे. त्याची उग्र शैली ट्रेलरमध्येही पाहायला मिळते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 13, 2024 9:36 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
तलवारीवर लटकता मृतदेह, मुलगा आईला...; 'देवरा'च्या त्या सीनवर रिलीज आधीच कात्री








