'तो अख्ख्या मुंबईसोबत झोपत होता!' अनुषा दांडेकरचे करण कुंद्रावर गंभीर आरोप, Ex बॉयफ्रेंडची इज्जतच काढली

Last Updated:

Anusha Dandekar : एकेकाळी टीव्ही अभिनेता करण कुंद्रासोबत अनुषा दांडेकरचं अफेअर खूप गाजलं होतं, पण ब्रेकअपनंतर अनुषाने आता तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर केलेले आरोप ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

News18
News18
मुंबई : बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी ब्रेकअपनंतर आपल्या जुन्या नात्यावर बोलताना अनेकदा धक्कादायक खुलासे करतात. असंच काहीसं लोकप्रिय व्हीजे आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर हिने केलं आहे. एकेकाळी टीव्ही अभिनेता करण कुंद्रासोबत तिचं अफेअर खूप गाजलं होतं, पण ब्रेकअपनंतर अनुषाने आता तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर केलेले आरोप ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अनुषा दांडेकरचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तिने तिच्या एका एक्स बॉयफ्रेंडबद्दल बोलताना खूप मोठा खुलासा केला आहे. तिने त्या व्यक्तीचं नाव घेतलं नाही, पण तिचं हे विधान थेट करण कुंद्राशी जोडलं जात आहे.
अनुषाने सांगितलं की, एकदा तिला एका डेटिंग ॲपच्या जाहिरातीसाठी करार करण्यात आला होता. तो करार खूप मोठा होता आणि त्यासाठी तिला मोठी फी मिळाली होती. तिने तिच्या बॉयफ्रेंडलाही त्या कॅम्पॅग्नमध्ये सहभागी करून घेतलं होतं.
advertisement

 अनुषा दांडेकरला चीट करत होता करण कुंद्रा?

याच डेटिंग ॲपचा वापर तिच्या बॉयफ्रेंडने इतर मुलींशी बोलण्यासाठी आणि जोडण्यासाठी करायला सुरुवात केली. अनुषा याबद्दल बोलताना म्हणाली, “मग त्याने ॲपचा वापर मुलींशी बोलण्यासाठी सुरू केला. तेव्हा मला जाणवलं की, तो अनेकदा चीटिंग करत होता.” इतकंच नाही, तर अनुषा दांडेकरने त्याच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत म्हटलं की, “तो अख्ख्या मुंबईसोबत झोपत होता!” अनुषाच्या या थेट विधानामुळे इंडस्ट्रीत मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement












View this post on Instagram























A post shared by @affi.kopo



advertisement

५ वर्षांचं नातं तुटलं!

व्हीजे अनुषा आणि अभिनेता करण कुंद्राचं नातं खूप गाजलं होतं. दोघेही अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये एकत्र दिसले होते. जवळजवळ पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०२० मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर करण कुंद्रा हा ‘बिग बॉस’मध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रकाशच्या प्रेमात पडला. गेली जवळपास चार वर्षे ते एकमेकांना डेट करत आहेत. अनुषाने आता हे सत्य उघड केल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तो अख्ख्या मुंबईसोबत झोपत होता!' अनुषा दांडेकरचे करण कुंद्रावर गंभीर आरोप, Ex बॉयफ्रेंडची इज्जतच काढली
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement