IND vs PAK : 'खूप घाबरलो होतो...', शिवम दुबेची पहिली रिएक्शन, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधला Video

Last Updated:

आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे. दुबईमध्ये झालेल्या या रोमांचक सामन्यात टीम इंडियाच्या 2 बॉल राखून विजय झाला.

'खूप घाबरलो होतो...', शिवम दुबेची पहिली रिएक्शन, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधला Video
'खूप घाबरलो होतो...', शिवम दुबेची पहिली रिएक्शन, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधला Video
दुबई : आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे. दुबईमध्ये झालेल्या या रोमांचक सामन्यात टीम इंडियाच्या 2 बॉल राखून विजय झाला. तिलक वर्मा आणि कुलदीप यादव भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. आशिया कपमधल्या या विजयानंतर भारतीय टीमने ड्रेसिंग रूममध्ये जोरदार सेलिब्रेशन केलं. तसंच प्रथेप्रमाणे ड्रेसिंग रूममध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा पुरस्कारही दिला गेला. टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ मॅचचा इम्पॅक्ट प्लेअर ठरवतो. आशिया कपच्या फायनलनंतर टीमचे फिजिओ कमलेश जैन यांनी हा पुरस्कार दिला.
'मेडल देण्यासाठी यापेक्षा मोठा दिवस असू शकत नाही. माझ्या रोजच्या कामापेक्षा वेगळं काम मला करायचं होतं. मॅचची पहिली ओव्हर टाकण्यापासून ते पॉवर प्लेमध्ये दोन महत्त्वाच्या ओव्हर टाकण्यापर्यंत. यानंतर बॅटिंग करताना त्याने मोक्याच्या क्षणी टीमला गरज असताना बाऊंड्री मारल्या. शिवम दुबे आजच्या मॅचचा इम्पॅक्ट प्लेअर आहे', अशी घोषणा कमलेश जैन यांनी केली.
advertisement
शिवम दुबेने आशिया कपच्या फायनलमध्ये भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. इम्पॅक्ट प्लेअरचा पुरस्कार मिळाल्यानंतर शिवम दुबेने या सामन्यात दबाव असल्याचं मान्य केलं. 'पहिली ओव्हर टाकायची होती, मी 100 टक्के दबावात होतो. माझ्यावर दबाव नव्हता, असं म्हणालो तर ते खोटं असेल. मी घाबरलो होतो. पण प्रत्येकाने मला पाठिंबा दिला, त्यामुळे भीती गेली', असं दुबे म्हणाला. दुबेच्या या वक्तव्यानंतर भारतीय खेळाडूंनी टाळ्या वाजवून कौतुक केलं.
advertisement
advertisement
शिवम दुबने मॅचच्या सुरूवातीलाच 2 ओव्हर टाकून फक्त 12 रन दिल्या. शिवम दुबेच्या 3 ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या बॅटरना फक्त 23 रन करता आले. यानंतर बॅटिंगमध्येही शिवम दुबेने तिलक वर्मासोबत पाचव्या विकेटसाठी 60 रनची पार्टनरशीप केली. पण 19व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलला सिक्स मारण्याच्या प्रयत्नात शिवम दुबेचा बाऊंड्री लाईनवर कॅच गेला. दुबे आणि तिलक यांच्यात झालेली ही पार्टनरशीप भारतासाठी मॅच विनिंग ठरली.
advertisement
आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानचा 146 रनवर ऑलआऊट झाला. साहिबझादा फरहान (38 बॉल 57 रन) आणि फखर झमान (35 बॉल 46) यांनी पाकिस्तानला चांगली सुरूवात दिली, पण त्यानंतर पाकिस्तानची बॅटिंग गडगडली. कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि बुमराहला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. पाकिस्तानच्या शेवटच्या 9 विकेट फक्त 33 रनवर गेल्या.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 'खूप घाबरलो होतो...', शिवम दुबेची पहिली रिएक्शन, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधला Video
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement