बापरे बाप! ‘वडापाव’ चित्रपटाच्या टीमसाठी बनवला भलामोठा कुरकुरीत वडापाव! वजन किती माहितीए?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Vadapav movie : ‘वडापाव’ या चित्रपटाचं प्रमोशन जोरदार सुरू असतानाच, चित्रपटाच्या टीमला हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांकडून एक भन्नाट आणि कुरकुरीत सरप्राईज मिळालं, ज्याने सगळ्यांनाच थक्क केलं!
मुंबई : सध्या मराठी सिनेसृष्टीत चर्चा आहे ती फक्त आणि फक्त ‘वडापाव’ या चित्रपटाची! चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनली आहेत. चित्रपटाचं प्रमोशन जोरदार सुरू असतानाच, चित्रपटाच्या टीमला हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांकडून एक भन्नाट आणि कुरकुरीत सरप्राईज मिळालं, ज्याने सगळ्यांनाच थक्क केलं!
शेफ्सची कमाल आणि ‘वडापाव’ टीम थक्क!
रामनाथ पय्याडे कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी स्टडीज येथील अतिशय हुशार विद्यार्थी आणि शेफ्सनी ‘वडापाव’ चित्रपटाच्या टीमसाठी एक खास भेट तयार केली. ती भेट म्हणजे, तब्बल साडेसात किलो वजनाचा महाकाय वडापाव!
शेफ्सची कमाल पाहून चित्रपटाची संपूर्ण टीम आनंदाने आणि आश्चर्याने भारावून गेली. या खास प्रसंगी दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेत्री गौरी नलावडे, रितिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, सिद्धार्थ साळवी, शाल्व किंजवडेकर तसेच निर्माते अमेय खोपकर आणि निनाद बत्तीन उपस्थित होते. सगळ्यांनी या भव्य वडापावच्या चवीचा मनमुराद आस्वाद घेतला!
advertisement
दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी कॉलेजच्या विद्यार्थी आणि शेफ्सचं भरभरून कौतुक केलं. ते म्हणाले, “एवढा मोठा वडापाव बनवणं खरंच खूप कठीण आणि आव्हानात्मक काम आहे. पण या तरुण शेफ्सनी हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेललं! त्यांनी आमच्यासाठी हे कुरकुरीत सरप्राईज तयार केलं, त्याबद्दल मी टीमकडून त्यांचे मनापासून आभार मानतो.”
advertisement
प्रसाद ओक यांनी पुढे धमाल शैलीत म्हटलं की, “आज आम्हाला हा भव्य आणि चविष्ट वडापाव भेट म्हणून मिळाला, आणि आम्हीही तुम्हा सर्वांना आमच्या ‘वडापाव’ची भेट २ ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये देणार आहोत!”
advertisement
हा चित्रपट एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट अंतर्गत तयार झाला आहे. संजय मेमाणे यांनी छायाचित्रण आणि सिद्धार्थ साळवी यांनी लेखन केलं आहे. या मनोरंजक चित्रपटाची आतुरता आता शिगेला पोहोचली आहे!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 9:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बापरे बाप! ‘वडापाव’ चित्रपटाच्या टीमसाठी बनवला भलामोठा कुरकुरीत वडापाव! वजन किती माहितीए?