Cyber Crime: फसवणुकीची आली नवी पद्धत, तुम्हाला देखील येईल असा फोन; रहा सतर्क
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
सायबर गुन्हेगार नवी पद्धत वापरत आहेत. संबंधित व्यक्ती फोनवर अश्लील फोटो किंवा व्हिडिओ बघत असल्याची बतावणी करून त्या व्यक्तीला अटकेची धमकी दिली जाते. यानंतर त्यांच्याकडून सर्व वैयक्तिक माहिती घेतली जाते. शेवटी बँक अकाउंटशी संबंधित माहिती मिळवून अकाउंट रिकामं केलं जातं.
नवी दिल्ली: लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी गुन्हेगार नवनवीन मार्गांचा अवलंब करत आहेत. काही ठिकाणी डिजिटल अरेस्टच्या घटना उघडकीस आल्या आहेत. फसवणुकीच्या या पद्धतीमध्ये फोन कॉलच्या माध्यमातून आरोपी संपर्क साधतात आणि त्या व्यक्तीला पोलीस किंवा सीबीआयसारख्या तपास संस्थेशी कनेक्ट केल्याचं सांगितलं जातं. संबंधित व्यक्ती फोनवर अश्लील फोटो किंवा व्हिडिओ बघत असल्याची बतावणी करून त्या व्यक्तीला अटकेची धमकी दिली जाते. यानंतर त्यांच्याकडून सर्व वैयक्तिक माहिती घेतली जाते. शेवटी बँक अकाउंटशी संबंधित माहिती मिळवून अकाउंट रिकामं केलं जातं.
अशी होते फसवणूक: अनेक प्रकरणांमध्ये सायबर गुन्हेगार लोकांना डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी देऊन घाबरवत आहेत. पीडितांकडून त्यांचे सर्व वैयक्तिक तपशील घेत आहेत. नोएडामध्ये असाच एक प्रकार घडला आहे. आयबी आणि मुंबई क्राइम ब्रँचच्या नावाने एका इंजिनीअरला फोन करण्यात आले. 'तुमच्या आधार कार्ड क्रमांकाचा वापर करून एक कुरिअर तैवानला पाठवलं जात आहे. त्यामध्ये अनेक प्रकारची ड्रग्ज आणि संशयास्पद पदार्थ सापडले आहेत. आमची टीम तुमची चौकशी करणार आहे. तोपर्यंत तुम्हाला डिजिटली अरेस्ट केलं जाईल आणि तुम्हाला आमच्यासमोर व्हिडिओ कॉलवर बसावे लागेल,' असं सांगण्यात आलं.
advertisement
सायबर गुन्हेगारांनी नोएडाच्या या इंजिनीअरला 48 तास व्हिडिओ कॉलवर बसून ठेवलं आणि त्याच्याकडून त्याची सर्व वैयक्तिक माहिती व बँक तपशील मिळवले. शेवटच्या क्षणी पीडिताच्या कुटुंबातल्या एका सदस्याला संशय आला. त्यामुळे इंजिनिअरने याबाबत मीडिया आणि पोलिसांकडे तक्रार केली. आता पोलीस या सायबर गुन्हेगारांवर कारवाई करत आहेत.
अशी करा तक्रार: तुम्हाला असा फोन आला आणि समोरची व्यक्ती स्वत:ला क्राइम ब्रँचची किंवा पोलीस अधिकारी म्हणत असेल तर तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू नये. जरी तुम्ही अश्लील फोटो किंवा व्हिडिओ बघत असाल किंवा यापूर्वी कधी बघितले असतील तरीही त्या व्यक्तीच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू नये किंवा घाबरू नये. अशा व्यक्तीचा फोन डिस्कनेक्ट करा आणि नंबर ब्लॉक करा. तसंच नंबरला स्पॅम म्हणून मार्क करा. असे फोन वारंवार येत असल्यास तत्काळ सायबर सेलकडे तक्रार करा.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
July 25, 2024 11:11 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
Cyber Crime: फसवणुकीची आली नवी पद्धत, तुम्हाला देखील येईल असा फोन; रहा सतर्क