IND vs ENG FINAL : वर्ल्ड कप फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीचा राडा, 55 बॉलमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढली, वादळी खेळी
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयसीसीच्या अंडर 19 वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी केली आहे. या खेळी दरम्यान त्याने 55 बॉलमध्ये सेंच्यूरी केली आहे.
India U19 vs England U19 : आयसीसीच्या अंडर 19 वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी केली आहे. या खेळी दरम्यान त्याने 55 बॉलमध्ये सेंच्यूरी केली आहे.या सेंच्यूरीच्या बळावर टीम इंडियाने दीड शतकीय धावा पूर्ण केल्या आहेत.
खरं तर टीम इंडियाचा अंडर 19 संघाचा कर्णधार आयुश म्हात्रेने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आरोन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी मैदानात उतरले होते. पण ऑरोन जॉर्ज 9 धावा करून बाद झाला होता. त्याच्यानंतर कर्णधार आयुश म्हात्रे मैदानात आला होता.
टीम इंडियाचा पहिला विकेट पडल्याने वैभव सूर्यवंशी आणि आयुश म्हात्रेला टीचून फलंदाजी करणे गरजेचे होते. त्यानुसार दोन्ही फलंदाजांनी टीचून फलंदाजी करून इंग्लंडला जेरीस आणले होते. या दरम्यान वैभव सूर्यवंशीने 32 बॉलमध्ये अर्धशतक ठोकले होते. या अर्धशतकानंतर आयुश म्हात्रेने देखील 51 बॉलमध्ये अर्धशतक केले होते. या खेळी दरम्यान आयुश म्हात्रेने 2 षटकार आणि 7 चौकार मारले होते. ज्यावेळेस आयुश म्हात्रे अर्धशतकाजवळ होता, त्याचवेळेस वैभव सूर्यवंशीने शतकाजवळ होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 2:46 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG FINAL : वर्ल्ड कप फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीचा राडा, 55 बॉलमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढली, वादळी खेळी







