advertisement

गोव्यात दोन गटांमध्ये तुफान राडा, लोकसभा निवडणुकीआधी थेट मुख्यमंत्र्यांनाच घेरलं

Last Updated:

नागरिकांना रोखण्यासाठी पोलिसांनी या वादात हस्तक्षेप केला. त्यामुळे स्थानिकांनी रोष व्यक्त केला आहे.

News18
News18
मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्याच दरम्यान विरोधकांनी भाजपला घेरायला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोधक भाजपला घेरत आहेत. गोव्यात सँकेलिममध्ये पालखी उत्सवाच्यावेळी रुद्रेश्वर मंदिरात दोन गटात बाचाबाची झाली. नागरिकांना रोखण्यासाठी पोलिसांनी या वादात हस्तक्षेप केला. त्यामुळे स्थानिकांनी रोष व्यक्त केला आहे.
ऐन निवडणुकीच्यावेळी दोन गटात झालेल्या बाचाबाचीमुळे भाजपचं टेन्शन वाढलं आहे. तर भाजपवर विरोधकांनी निशाणा साधला आहे. सँकेलिममध्ये पालखी उत्सवादरम्यान दोन गट आमनेसामने आले. या घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर टीका केली जात आहे. पोलिसांनी परिस्थिती हाताळण्याऐवजी त्यांच्यामुळे स्थिती बिघडली असा आरोप एका गटाने केला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सँकेलिम हा गड मानला जातो. याच मतदारसंघातच हा प्रकार घडल्यानं विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये मोठी नाराजी आहे. शिवाय विरोधकांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
advertisement
गोव्याचे आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. एवढा मोठा राडा होत असताना पोलीस बघ्याची भूमिका का घेत होते? पोलिसांच्या या बेफिकीर वृत्तीमुळे वादावादी झाल्याचा आरोप अमित पालेकर यांनी केला.
गोव्याच्या काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनील कावथंकर यांनीही सरकारवर टीका केली. एवढी मोठी सुरक्षा असूनही दोन गटात वाद होणं हे दुर्देवी. लोकसभा निवडणुका सुरू असताना असे प्रकार राज्यात घडायला नको. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखली गेली पाहिजे, असं सुनील कावथंकर यांनी म्हटलं.
view comments
मराठी बातम्या/गोवा/
गोव्यात दोन गटांमध्ये तुफान राडा, लोकसभा निवडणुकीआधी थेट मुख्यमंत्र्यांनाच घेरलं
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement