Dombivli : डोंबिवलीत पलावा सिटीसमोर सुटकेसमध्ये आढळला होता तरुणीचा मृतदेह, 24 तासांत आरोपी सापडला, कृत ऐकून अंगावर येईल शहारे
- Published by:Sachin S
- Reported by:AJIT MANDHARE
Last Updated:
डोंबिवलीतील पलावा सिटीसमोरील खाडीमध्ये दोन दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला होता.
डोंबिवली : डोंबिवलीतील पलावा सिटीसमोरील खाडीमध्ये दोन दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. अखेरीस पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या २४ तासांमध्ये छडा लावला आहे. तरुणीच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचं उघड झाालं आहे. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.
डोंबिवलीतील डायघर परिसरात आज दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आहे. डोंबिवलीतील प्रसिद्ध पलावा सिटी समोरील खाडीमध्ये ही सुटकेस आढळली होती. या सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह होता. पोलिसांनी परिसरातील सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक व्यक्ती सुटकेस घेऊन जाताना आढळली. पोलिसांनी या प्रकरणी श्रीनिवास विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने तरुणीचा खून केल्याचं कबूल केलं.
advertisement
आरोपी श्रीनिवास विश्वकर्मा हा त्या तरुणीचा प्रियकर होता. ही तरुणी ४ महिन्यांची गर्भवती होती. आरोपी विश्वकर्माने तरुणीवर लैगिंक अत्याचार केले होते. त्यातून तरुणी गर्भवती राहिली होती. या अवस्थेतही आरोपी तरुणीवर लैंगिक अत्याचार करत होता. मात्र शुक्रवारी तरुणीने शरीरसंबधासाठी नकार दिला म्हणून आरोपी श्रीनिवास विश्वकर्माने तिचा गळा आवळून खून केला.
या तरुणीचा खून केल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी घरातीलच बॅगेत तरुणीचा मृतदेह कोंबून बॅग घरातच ठेवली होती. त्यानंतर रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास बॅग देसाई खाडीत फेकून दिली होती. ही घटना दोन दिवसांनी उघडकीस आली होती.
advertisement
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी एका कॅमेऱ्यात आढळून आला. तांत्रिक तपास करत शिळ डायघर पोलिसांनी २४ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ आणि पीआय राजपूत यांच्या टीमने २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावला. आरोपी श्रीनिवास विश्वकर्मा याला उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथून अटक केली आहे.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर तरुणी मागायची भीक
view commentsमृत तरुणीही रेल्वे प्लेटफॅार्मवर भिक मागायची. ५ वर्षांपूर्वी श्रीनिवास विश्वकर्मा तिला आपल्या घरी घेवून आला होता. कधी बहीण कधी मुलगी तर कधी बायको म्हणून तो तिची ओळख लोकांना सांगायचा पण तो तिच्यावर सारखे लैंगिक अत्याचार करायचा. तिने नकार देताच त्याने तिची हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावली होती पण शिळडायघर पोलिसांनी २४ तासात प्रकरण उघडकीस आणलं. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
November 25, 2025 10:49 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli : डोंबिवलीत पलावा सिटीसमोर सुटकेसमध्ये आढळला होता तरुणीचा मृतदेह, 24 तासांत आरोपी सापडला, कृत ऐकून अंगावर येईल शहारे


