Shocking : बदलापूरवरुन मुलीला पळवून मुंबईला फिरायला निघाला; पण काही क्षणात असं काही घडलं की सगळेच हादरले

Last Updated:

Badlapur Cirme : बदलापूर शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. तिथे वडिलांच्या सतर्कतेमुळे मुलीला वाचवण्याच यश आले आहे. नक्की काय घडलं पोलिसांनी तपास कसा काय लावला या बदद्ल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

News18
News18
बदलापूर : बदलापूरात घडलेल्या प्रकाराने सर्वजण हादरून गेलेल आहेत . एका अल्पवयीन मुलीला फसवून पळवून नेण्याची घटना समोर आली आहे, ज्यामुळे पालकांसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव फैजल शेख असून त्याने मुलीला आपले खोट नाव सांगून फसवले. ज्यात त्याने मुलीला आपले नाव तेजस असल्याचे सांगितले आणि तिचा विश्वास संपादन केल्यावर तिला पळवून मुंबईला फिरायला नेले.
वडिलांच्या सतर्कतेमुळे झाला संपूर्ण प्रकरणाचा खुलासा
पालकांना संशय आल्यावर त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली आणि तत्काळ कारवाई सुरु झाली. पोलिसांनी आरोपीशी संपर्क साधत, त्याला फोनवर बोलावले आणि बदलापूर परिसरात अटक केली. प्राथमिक चौकशीत असे लक्षात आले की फैजल शेख याच्यावरील आधीच्या गुन्ह्यांची नोंद पोलिसांकडे आहे त्यामुळे त्याचा गुन्हेगारी इतिहास उघड झाला.
advertisement
या घटनेने परिसरात मोठी भिती पसरली आहे, कारण एका अल्पवयीन मुलीला फसवणे, तिचा विश्वास संपादन करणे आणि तिला पळवून घेऊन जाणे ही अत्यंत गंभीर घटना आहे. पालकांसाठी आणि समाजासाठी ही घटना गंभीर ठरते, की मुलांवर सतत लक्ष ठेवणे शिवाय त्यांची काळजी घेणे किती महत्त्वाची आहे. आरोपीच्या अटकेनंतर त्याच्या कारवाईपूर्वीच्या हालचालींचा सविस्तर तपास सुरु केला आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Shocking : बदलापूरवरुन मुलीला पळवून मुंबईला फिरायला निघाला; पण काही क्षणात असं काही घडलं की सगळेच हादरले
Next Article
advertisement
BJP Shiv Sena Shinde : डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?
डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?
  • डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?

  • डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?

  • डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?

View All
advertisement