advertisement

बदलापूरमध्ये मोठा राडा, निवडणूक अधिकाऱ्यांशी बाचाबाची; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, छावणीचे स्वरूप

Last Updated:

राज्यातील 20 जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून या ठिकाणच्या निवडणुका पुढील काही दिवसांनी होणार आहेत

News18
News18
गणेश मंजुळा अनंत, प्रतिनिधी
मुंबई :  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज 'सुपर संडे' आहे. सोमवारी रात्री प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. निवडणुकांचा प्रचार सध्या अंतीम टप्प्याक आहे. मात्र, त्याआधीच निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या बदलापूरची निवडणूक पुढे ढकलली आहे. फक्त बदलापूर नाही तर राज्यातील 20 जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून या ठिकाणच्या निवडणुका पुढील काही दिवसांनी होणार आहेत.या निवडणुका पुढे ढकलल्याने बदलापूरमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला आहे.
advertisement
बदलापूरची निवडणूक 20 दिवसांनी लांबणीवर गेल्याने मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या सहा जागांसाठीचं मतदान पुढे ढकलल्याने कोणाला मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाला. निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे काही वेळासाठी तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

नेमकं काय घडलं?

बदलापूर नगर परिषदेच्या सहा जागांसाठीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्या संदर्भाची काय प्रक्रिया असेल यासाठी माहिती देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एक बैठक आयोजित केली होती. मात्र त्या बैठकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. या सहा जागांमधील उमेदवारांना योग्य उत्तर मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर गोंधळ घातला. सध्या या ठिकाणी वातावरण प्रचंड तापल असून मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालाय. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची कुमक या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मागवली आहे.
advertisement

कोणत्या प्रभागातील निवडणुका पुढे?

बदलापूर नगरपरिषद निवडणुकीतील 6 जागांच्या मतदानाची तारीख पुढे गेली आहे. निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 2 डिसेंबरला होणारं मतदान आता थेट 20 डिसेंबरला होणार आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात सहा प्रभागांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आलं आहे. अंबरनाथ नगरपरिषेदतील प्रभाग क्रमांक 5 ब आणि प्रभाग 15 ब, प्रभाग क्रमांक 17 अ, प्रभाग क्रमांक 10 ब, प्रभाग क्रमांक 8 अ, प्रभाग 19 अ या प्रभागात नव्या कार्यक्रमानुसार निवडणूक घ्यावी लागणार आहे. नगरपरिषद निवडणूक आता वीस दिवस लांबणीवर गेली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांसह स्थानिक प्रशासनालाही धक्का बसला आहे. काही उमेदवार निवडणूक निर्णय अधिकाराच्या निकालाविरोधात न्यायालयात गेले होते. त्यामुळे न्यायालयाने या प्रभागाच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
बदलापूरमध्ये मोठा राडा, निवडणूक अधिकाऱ्यांशी बाचाबाची; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, छावणीचे स्वरूप
Next Article
advertisement
BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement