Beed News: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, बीड शरद पवारांनी भाकरी फिरवली; मोठी खळबळ
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Prachi Amale
Last Updated:
गेवराई नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना घेण्यात आलेल्या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
बीड : बीडसह गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई आणि धारुर नगर पालिकांच्या निवडणुकांचा प्रचार रंगात आणि शिगेला पोहचला आहे. जिल्ह्यात मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित, नमिता मुंदडा या सत्तापक्षातील आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर ताकदीने आपापल्या नगरपालिका लढवत आहेत. दरम्यान गेवराई नगर परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे.
गेवराई नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी आणि ओबीसी समाज बांधवांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे. नगरपालिका निवडणुकीनिमित्त गेवराईमध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
आमदार विजयसिंह पंडित यांची प्रतिष्ठा पणाला
नगरपालिका निवडणुकीत मागील पंधरा वर्षांपासून माजी आमदार लक्ष्मण पवार यांची एक हाती सत्ता आहे. आणि हीच सत्ता उलटून टाकण्यासाठी आमदार विजयसिंह पंडित यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. आणि अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील नगराध्यक्ष पदासह 14 ठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत. याच दरम्यान ओबीसी समाजाने आपली भूमिका स्पष्ट करून पंडित पवारांची कोंडी केली. ओबीसीच्या या भूमिकेमुळे गेवराई नगरपालिका निवडणुकीत चित्र बदललेले असेल असा विश्वास लक्ष्मण हाके यांचे सहकारी बळीराम खटके यांनी व्यक्त केला.
advertisement
हाके वि. पंडित काय आहे वाद?
बीडमध्ये झालेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. ओबीसींच्या दारात आले तर दंडुका हातात घेणार, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले होते. यानंतर पंडित समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले. या विधानाचा निषेध करत गेवराई शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात लक्ष्मण हाके यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. आंदोलकांनी दंडुके मारत पुतळ्याला आग लावली आणि जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला लक्ष्मण हाके हे गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले असता विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यावेळी हाके आणि पंडित यांचे समर्थक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले होते.
advertisement
बीड शहरात उद्या मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा
बीड नगरपालिका निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. त्या अनुषंगाने बीड शहरातील पारस मैदान येथे सभेची तयारी सुरू आहे.. बीड शहरात दोन क्षीरसागर - पंडित यांची प्रतिष्ठापणा लागली आहे. या अगोदर बीडमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या दोन सभा झाल्या आहेत आता भाजपकडून थेट मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित केल्याने विरोधकांच्या भुवया या उंचावल्या आहेत
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 30, 2025 4:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed News: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, बीड शरद पवारांनी भाकरी फिरवली; मोठी खळबळ








