advertisement

Kalyan-Taloja Metro : शिळफाट्याची ट्रॅफिक विसरा! मेट्रो 12ची मार्गिका ठरणार गेमचेंजर; जाणून घ्या कुठे असतील स्थानकं?

Last Updated:

Mumbai Metro 12 : शिळफाटा मार्गे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून कायमची सुटका मिळणार आहे.

Kalyan-Taloja Metro 12
Kalyan-Taloja Metro 12
ठाणे : मुंबईतील मुंबई मेट्रो लाईन 12 या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे . ‘ऑरेंज लाइन’ म्हणून ओळखली जाणारी ही मेट्रो मार्गिका ठाणे जिल्ह्यातील कल्याणपासून नवी मुंबईतील तळोजापर्यंत धावणार आहे. या प्रकल्पातील 200 वा यू-गर्डर गोलवली स्थानकाजवळ यशस्वीपणे उभारण्यात आला असून हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
कल्याण ते तळोजा प्रवास आता सुसाट
ही मार्गिका एकूण 23.57 किमी लांबीची असून 19 स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो 12 मुळे कल्याण-डोंबिवली परिसराला नवी मुंबई आणि प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडणी मिळणार आहे. ही पूर्णपणे उन्नत मार्गिका असून कल्याण-शिळफाटा -तळोजा रस्त्याला समांतर धावणार आहे. पुढे जाऊन ती 7 किमी लांबीच्या उड्डाणपुलालाही जोडली जाणार आहे.
advertisement
मेट्रोवरून थेट रेल्वे स्थानकाकडे मार्ग
या मार्गिकेमुळे प्रवाशांना इतर मेट्रो लाईनशीही सुलभ कनेक्टिव्हिटी मिळेल. कल्याण स्थानकावरून मेट्रो लाइन 5, हेदुतणे स्थानकावरून मेट्रो लाइन 14 आणि अमांडूट स्थानकावरून नवी मुंबई मेट्रो लाइन 2 शी जोडणी होणार आहे. तसेच कल्याण मेट्रो स्थानकावरून कल्याण रेल्वे जंक्शनवरही सहज जाता येईल.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan-Taloja Metro : शिळफाट्याची ट्रॅफिक विसरा! मेट्रो 12ची मार्गिका ठरणार गेमचेंजर; जाणून घ्या कुठे असतील स्थानकं?
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement