Kalyan- Dombivli Election: कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकींच्या घोषणा, मतदान आणि मतमोजणी कधी?

Last Updated:

कोरोनामुळे रखडलेल्या महापालिकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या एका महानगरपालिकेपैकी एक असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे.

Kalyan- Dombivli Election: कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकींच्या घोषणा, मतदान आणि मतमोजणी कधी?
Kalyan- Dombivli Election: कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकींच्या घोषणा, मतदान आणि मतमोजणी कधी?
कल्याण- डोंबिवली: राज्य निवडणूक आयोगाने आज (15 डिसेंबर) कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या घोषणा केल्या आहेत. कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुका 15 जानेवारी 2026 या तारखेला होणार असून या निवडणुकांचा निकाल 16 जानेवारी 2026 तारखेला जाहीर होणार आहे. महानगर पालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केली आहे.
शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये कल्याण- डोंबिवली एक प्रमुख महानगर पालिका आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची सुद्धा कार्यकाळ संपला आहे, त्या निवडणुकीची आज घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक पक्ष केडीएमसी परिसरात सध्या चांगलीच कंबर कसताना दिसत आहे. केडीएमसी परिसरातील अनेक राजकीय नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना दिसत आहेत. यामध्ये, सर्वाधिक भाजपा पक्षामध्ये उमेदवारांचं इनकमिंग पाहायला मिळते. आता अशातच केडीएमसीमध्ये कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
advertisement
मुंबई, ठाणे आणि कल्याण- डोंबिवली महानगर पालिकांसह महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुकींसाठीची आचारसंहिता आजपासूनच निवडणूक आयोगाने लागू केली आहे, त्यामुळे कोणत्याच राजकीय पक्षाला प्रकल्पांचं उद्घाटन किंवा लोकार्पण तसंच भूमिपूजन करता येणार नाही. तसंच मतदानावर परिणाम होईल, अशी कोणतीही घोषणा करण्यात येणार नाही. कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रामध्ये, 107 प्रभाग असून जे 7 प्रशासकीय वॉर्डमध्ये विभागलेले आहेत. या 107ं प्रभागांमध्ये मतदान पार पडणार आहे. या मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेच्या तारखा आणि कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
advertisement
अर्ज भरण्याची तारीख: 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025
अर्ज छाननीची तारीख: 31 डिसेंबर 2025
अर्ज मागे घ्यायची तारीख: 2 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी: 3 जानेवारी 2026
निवडणुकीची तारीख: 15 जानेवारी 2026
मतमोजणीची तारीख: 16 जानेवारी 2026
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan- Dombivli Election: कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकींच्या घोषणा, मतदान आणि मतमोजणी कधी?
Next Article
advertisement
Vinod Ghosalkar On Tejasvee Ghosalkar: तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांगितलं...
तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग
  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

View All
advertisement