advertisement

Kalyan Dombivali Water Shutdown: कल्याण-डोंबिवलीकरांनो, पाणी जपून वापरा! मंगळवारी 8 तास बंद राहणार पाणी पुरवठा

Last Updated:

कल्याण- डोंबिवली शहरासह ग्रामीण भागात येत्या मंगळवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. केडीएमसीकडून सर्व नागरिकांना शटडाऊनच्या आदल्या दिवशी मुबलक आणि आवश्यक तितके पाणी भरून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
कल्याण- डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा या जलशुद्धीकरण केंद्रातून केडीएमएसी क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा केला जातो. या चारही केंद्रावरील विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची अत्यावश्यक देखभाल- दुरूस्तीची कामे हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी कल्याण- डोंबिवली शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी पुरवठा बंदचा फटका बसला आहे. केडीएमसीकडून सर्व नागरिकांना शटडाऊनच्या आदल्या दिवशी मुबलक आणि आवश्यक तितके पाणी भरून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
येत्या मंगळवारी (27 जानेवारी 2026) जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची अत्यावश्यक देखभाल- दुरूस्तीची कामे हाती घेतले जाणार आहे. सकाळी 10:00 ते सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत (8 तास) महानगर पालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम सोबतच कल्याण ग्रामीण देखील या भागातही पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कल्याण ग्रामीणमध्ये (मांडा- टिटवाळा, वडवली, आंबिवली, टिटवाळा, शहाड आणि इतर भागातील गावं) पाणी पुरवठा उपलब्ध होणार नाही.
advertisement
महानगरपालिकेकडून नागरिकांना असे आवाहन करण्यात आले की, येत्या सोमवारीच नागरिकांनी आवश्यक तितका पाणी पुरवठा भरून ठेवायचा आहे. कल्याण- डोंबिवलीसह कल्याण ग्रामीण भागातील नागरिकांनाही शटडाऊनचा फटका बसणार आहे. त्यामुळे संपूर्णच कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तीव्र पाणीकपातीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेकडून या बंदच्या काळात विद्युत यंत्रणा पंप, यांत्रिक उपकरणे, तांत्रिक प्रणालीची तातडीची दुरूस्ती आणि देखभाल करण्यात येणार आहे. सुरळित आणि सुरक्षित पाणी पुरवठ्यासाठी संपूर्ण यंत्रणा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
शट डाऊनशिवाय पर्याय नसल्यामुळे केडीएमसीने पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेकडून नागरिकांना पूर्वीच पाणी येणार नसल्याचा सतर्कतेचा इशारा देत पाणी साठवणूक करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan Dombivali Water Shutdown: कल्याण-डोंबिवलीकरांनो, पाणी जपून वापरा! मंगळवारी 8 तास बंद राहणार पाणी पुरवठा
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement