Kalyan: कल्याणकरांचा प्रवास आणखीन जलद होणार, तिसरा पत्री पुल कधीपासून सुरू होणार?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कल्याण पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या आता तिसऱ्या पत्रीपुलाचे काम सध्या जोरदार सुरू आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कल्याण पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या आता तिसऱ्या पत्रीपुलाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुलाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. पुलाचे काम बरेच बाकी असून लवकरच मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. नेमका हा ब्लॉक केव्हा घेतला जाणार, याची माहिती कळू शकलेली नाही.
कल्याण डोंबिवलीला जोडणाऱ्या तिसऱ्या पत्री उड्डाणपुलाचे काम जानेवारी अखेर पूर्ण होऊन फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या त्याचे आठवड्यात लोकार्पण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी 31 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या पुलाचे 36.6 आणि 40 मीटर अशा दोन भागात गर्डर असून, पुलाची एकूण लांबी 109 मीटर आहे. पुलाचे गर्डर टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, जानेवारी महिन्यात पूर्ण होईल. मध्य रेल्वे त्या कामी विशेष ट्रॅफिक ब्लॉक देणार असल्याचेही सांगण्यात आले.
advertisement
कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा पत्रिपूल नेहमीच वर्दळीचा असतो. या पूलावरून अनेक परिसरांतून गाड्यांची ये- जा होत असते. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती, बायपास, ठाकुर्ली यासह अनेक भागामध्ये जाण्यासाठी मार्ग आहे. त्यामुळे सर्वांच्याच दृष्टीने हा पुल फार महत्त्वाचा आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
December 10, 2025 9:30 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan: कल्याणकरांचा प्रवास आणखीन जलद होणार, तिसरा पत्री पुल कधीपासून सुरू होणार?








