KDMC Election : निकालाचे आकडे दिसताच भाजपने शिवसेनेला डिवचलं, थेट महापौरपदावर दावा ठोकला!

Last Updated:

मुंबईसह राज्यातल्या बहुतेक सर्व महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल असं निकालातून स्पष्ट दिसत आहे, पण संपूर्ण निकाल हाती यायच्या आधीच भाजपने शिवसेनेला डिवचलं आहे.

निकालाचे आकडे दिसताच भाजपने शिवसेनेला डिवचलं, थेट महापौरपदावर दावा ठोकला!
निकालाचे आकडे दिसताच भाजपने शिवसेनेला डिवचलं, थेट महापौरपदावर दावा ठोकला!
कल्याण : महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबईसह राज्यातल्या बहुतेक सर्व महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल असं निकालातून स्पष्ट दिसत आहे, पण संपूर्ण निकाल हाती यायच्या आधीच भाजपने शिवसेनेला डिवचलं आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपने थेट महापौरपदावर दावा केला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केडीएमसीच्या महापौरपदाची मागणी केली आहे.
युती धर्म पाळून भाजपला अडीच वर्ष महापौरपद द्यावं, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये आतापर्यंत महापौरपद हे फक्त शिवसेनेकडे होतं. आता भाजपने कल्याण-डोंबिवलीमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर महापौरपदासाठी 50-50 चा फॉर्म्युला अवलंबला जावा, अशी मागणी केली आहे.

कल्याण-डोंबिवलीचे आकडे

कल्याण डोंबिवलीमध्ये 122 जागांपैकी सध्या शिवसेनेने 36 जागांवर तर भाजपने 25 जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 2 आणि मनसेला 3 जागांवर विजय मिळाला. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इथे अजून एकही जागेवर आघाडी मिळालेली नाही. 122 जागांच्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 62 जागांची गरज आहे. भाजप-शिवसेनेने आताच 61 जागा जिंकल्यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार, हे स्पष्ट झालं आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये मतदानाआधीच भाजपचे 15 आणि शिवसेनेचे 7 असे 22 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले, त्यामुळे पहिलं मत पडण्याच्या आधीच या निवडणुकीची चुरस जवळपास संपल्यात जमा होती.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
KDMC Election : निकालाचे आकडे दिसताच भाजपने शिवसेनेला डिवचलं, थेट महापौरपदावर दावा ठोकला!
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement