advertisement

Karjat Crime : कर्जत हादरलं! ओळखीच्या महिलेनं वृद्धाला गाठलं, कारमध्ये बसवलं अन् घरी नेत केलं भयंकर कांड

Last Updated:

Karjat Crime : नागपूरमधील वृद्धासोबत कर्जत स्थानक परिसरात घडलेल्या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. जिथे नेमक या वृद्धासोबत काय घडलं आहे आणि पोलिस तपासात काय समोर आले.

कर्जत रेल्वे स्थानकाजवळ वृद्धाचे अपहरण आणि लूट
कर्जत रेल्वे स्थानकाजवळ वृद्धाचे अपहरण आणि लूट
कर्जत : कर्जत रेल्वे स्थानक परिसरात एका 61 वर्षीय वृद्ध व्यक्तीसोबत एक भयंकर घटना घडली आहे. या प्रकरणी सध्या कर्जत पोलिसांनी एका महिलेसह दोन जणांना अटक करण्यात आली असून अजून एका आरोपीचा शोध सुरु आहे.
कर्जत स्थानक परिसरात घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत स्थानक परिसरात पीडीत 61 वर्षे व्यक्तीचे अपहरण करुन त्याच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटण्यात आले. या घटनेची तक्रार खुद्द पीडीत वृद्ध व्यक्तींनी पोलिसांकडे येऊन केलेली आहे. ही घटना 8 ते 9 मार्च दरम्यान घडली. या प्रकरणाचा तपास कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड आणि कर्जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सय्यद करत आहेत.
advertisement
कर्जतचा थरार समोर
पीडित वृद्ध सुनील गजघाटे (वय61) हे नागपूर येथे वास्तव्यास असून घटनेदिवशी ते काही कामानिमित्ताने कर्जत येथे आले होते. दरम्यान आरोपी महिला आदिती ढोके हिने सुनील यांना कर्जत रेल्वे स्थानकात बोलावले आणि कारमध्ये नेत वेगवेगळ्या ठिकाणी फिरवले. मात्र या महिलेसोबत आरोपी सुशील जाधव आणि गणेश प्रधान हे साथीदारही तिच्या सोबत होते. या दोघांच्या मदतीने वृ्द्ध व्यक्ती सुनील यांचे अपहरण करण्यात आले.
advertisement
अपहरण केल्यानंतर सुनील यांना दोन आरोपीतील ढोकेच्या घरी नेण्यात आले आणि तिथं त्यांना मारहाण करण्यात आली शिवाय चॉपरचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. पण धमकी ने घाबरलेल्या सुनील यांनी आणि धमकीच्या जोराव आरोपींनी सुनील यांच्याकडील सोन्याची साखळी, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि 15 हजार रुपये ,दोन मोबाईल अशसा सुमारे 2 लाख 15 हजार रुपयांचे सर्व सामान लुटले. आरोपी यावर थांबले नाही तर सुनील यांच्याकडून जबरदस्तीने एटीएम कार्डचा पिन नंबरही घेतला आणि त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढले. तसेच क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदीही केल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Karjat Crime : कर्जत हादरलं! ओळखीच्या महिलेनं वृद्धाला गाठलं, कारमध्ये बसवलं अन् घरी नेत केलं भयंकर कांड
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement