Kalyan Viral Video : प्रवाशांनी दरवाजा उघडला अन्... कल्याण लोकलमधील 'त्या' व्यक्तीचा धक्कादायक प्रकार उघड; VIDEO
Last Updated:
Kalyan Local Viral Video : कल्याण लोकलमध्ये अमली पदार्थ सेवनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांमध्ये संताप पसरला आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे प्रवासी असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत असून रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
कल्याण : गेल्या काही वर्षात लोकल ट्रेनमध्येही अनेक अपराध घडत असतात, वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना समजतही असतात. त्यातच पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतील घटनेने प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं करतात.
कल्याण लोकलमध्ये घडला भीषण प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला व्हिडिओ कल्याणहून बदलापूरला जाणाऱ्या लोकलमधील आहे जिथे लोकलमध्ये खुलेआम अमली पदार्थांचे सेवन करण्यात येतं होतं. दरम्यान हा प्रकार लोकलमधील एका तरुणाला खटकला आणि त्यानंतर लोकलमधील प्रवाशांनी त्या नशेखोराला चोप दिला. या सर्व प्रकारांमुळे सामान्य प्रवासी आता अक्षरशः भयभीत झाले आहेत. लोकल ट्रेनही दररोज प्रवास करणाचे साधन असून याच ठिकाणी जर अशा घटना घडत असतील तर पुन्हा एकदा असुरक्षिततेचा प्रश्न उभा राहतो.http
advertisement
advertisement
याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीही अशीच एक घटना कल्याण रेल्वे स्थानकातून समोर आली होती. जिथे एका माल डब्ब्यात एका तरुण नशा करत होता. दरम्यान तेव्हा ही काही प्रवाशांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला होता,पण त्याने तो चिडला आणि प्रवाशांनाच उलटसुलट बोलू लागला होता.
या सर्व घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रवाशांच्या अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत, काहींनी म्हटलं आहे की, ''ही परिस्थिती असह्य झाली आहे, अजून किती सहन करायचे?'' त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2025 9:03 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan Viral Video : प्रवाशांनी दरवाजा उघडला अन्... कल्याण लोकलमधील 'त्या' व्यक्तीचा धक्कादायक प्रकार उघड; VIDEO











