Dombivli: 'डोंबिवलीत निवडणुका पुढे ढकला', भाजप नेत्यानेच केली मागणी, घेतला वेगळाच संशय

Last Updated:

'ठाकरे बंधू पाठोपाठ आता भाजपने सुद्धा मतदार यादीतील घोळावर आवाज उठवला आहे. मतदार यादी आणि त्यातील दुबार मतदारांचा मुद्दा काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये.

News18
News18
कल्याण : राज्यात नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. पण या निवडणुकीमध्ये दुबार मतदारांचा प्रश्न ऐरणीवर आला. मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरही मोठ्या प्रमाणात दुबार मतदारांची आकडेवारी समोर आली आहे. अशातच कल्याण पश्चिमेतील मतदार यादीत मोठ्या संख्येनं दुबार मतदार आहे, यादी बिनचूक होईपर्यंत निवडणूक घेऊ नका, अशी मागणीच भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. तसंच,  दुबार मतदारांमध्ये कुणाचं तरी षडयंत्र असल्याचा संशयच त्यांनी व्यक्त केला.
अंबरनाथमधील मतदार यादीमधील गोंधळावरून भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकारी वर्गला धारेवर घेतलं होतं आणि निवडणूक रद्द करावी, अशी मागणी केली होती. यानंतर अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका पुढे गेल्या यातच आता कल्याण पश्चिमेतील मतदार यादीत मोठ्या संख्येनं दुबार मतदार, यादी बिनचूक होईपर्यंत निवडणूक घेऊ नका. आवश्यक पडल्यास निवडणुका पुढे ढकला अशी मागणी पत्रकार परिषद घेत भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे.
advertisement
'ठाकरे बंधू पाठोपाठ आता भाजपने सुद्धा मतदार यादीतील घोळावर आवाज उठवला आहे. मतदार यादी आणि त्यातील दुबार मतदारांचा मुद्दा काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील एका पॅनेलमध्ये तब्बल 1800 दुबार मतदार असल्याचं सांगत ही सर्व एका विशिष्ट समाजाचे मतदार आहेत. ते पाहता मतदार यादी बिनचूक होईपर्यंत कल्याण डोंबिवलीतील निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी कल्याण पश्चिमेतील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे.
advertisement
तसंच मतदार यादीतील दुबार मतदार काढून ती अद्ययावत करूनही इतक्या मोठ्या संख्येनं दुबार मतदारांची नावे असण्यामागे काही षडयंत्र आहे का? असा संशयही भाजपने व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli: 'डोंबिवलीत निवडणुका पुढे ढकला', भाजप नेत्यानेच केली मागणी, घेतला वेगळाच संशय
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement