advertisement

Kalyan : काय हा दुर्दैवी योगायोग? आजोबांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशीच नातवाचा अपघाती मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Last Updated:

Shocking News : आजोबांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी नातवासोबत असं काही घडतं ज्याने संपूर्ण कुटुंबिय हादरुन जातात. नेमका हा प्रकार कुठे घडला आणि याबाबतीत कोणाला अटक केलेली आहे ते जाणून घ्या.

News18
News18
कल्याण : अनेकदा एक दु:ख सावरताना त्यात वेळी असं काही घडतं की संपूर्ण कुटुंब हादरुन जातं. सध्या असाच एक दुर्देवी आणि भावनिक प्रकार कल्याण जवळील म्हारळमधून समोर आलेला आहे.
काय घडलं?
म्हारळ परिसरात एक दुर्दैवी अपघात घडला आहे. आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी आलेल्या 25 वर्षीय तरुणाचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना वरपगाव येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव वैभव भामरे असे आहे. वैभव आपल्या नातेवाईकांकडे वर्षश्राद्धासाठी आला होता. तो वरप येथील मावस भाऊ चंद्रशेखर पवार यांच्या घरी थांबला होता. याच दरम्यान थारवाणी गृह संकुलाजवळ म्हारळ-पाडा रस्त्यावरून तो दुचाकीवरून जात असताना खडीने भरलेल्या भरधाव डंपरने त्याला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की वैभवचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
आरोपीविरोद्धात गुन्हा दाखल
या प्रकरणी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास टिटवाळा पोलिस करत आहेत. वर्षश्राद्धासाठी आलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan : काय हा दुर्दैवी योगायोग? आजोबांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशीच नातवाचा अपघाती मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement