मुंबई-गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, पर्यायी मार्ग कोणता?
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या पुलांची कामे पूर्ण करण्यासाठी ११ जुलै ते १३ जुलै या कालावधीत ब्लॉक घेतला जाणार आहे.
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील पुई येथील मे कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने राष्ट्रीय महामार्गाकडे या पुलाच्या कामाचे गर्डर बसविण्याकरीता चक्क महामार्गा बंद ठेवण्याचा अर्ज केलाय. कोलाड जवळील पुई येथे म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसवण्याच्या कामासाठी मुंबई-गोवा महामार्गावर ११ जुलै ते १३ जुलै दरम्यान सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ या दोन सत्रात ब्लॉक घेतला जाणार आहे.
ऐन पावसाळ्यात आता आगामी काळामध्ये येऊन ठेपणाऱ्या गणपती उत्सवामध्ये अनेक पुलांची काम पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या. आता याच कामासाठी तीन दिवस सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळेत महामार्ग बंद ठेवला जाणार आहे. यामुळे प्रवाशांना यावेळेत अडचणींचा सामना करावा लागू शकते. यासाठी पर्यायी मार्गाची माहिती प्रशासनाने दिलीय.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग -
१) वाकण फाटा येथून भिसे खिंड-रोहा- कालाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.
advertisement
२) वाकण फाटा येथून पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपुर-माणगांव वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.
३) खोपोली-पाली-वाकण राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपुर-माणगांव वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.
गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग -
१) कोलाड येथून कालाड-रोहा-भिसे खिंड-वाकण फाटा किंवा नागोठणे वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.
advertisement
२) कोलाड येथून रवाळजे-पाली वरून वळवून वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.
३) कोलाड येथून रवाळजे-पाली-वाकण फाटा वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 10, 2024 3:38 PM IST


