Konkan Railway : कोकण रेल्वेचा मोठा निर्णय! 8 गाड्यांना मिळाला थांबा; कधी होणार सुरू?

Last Updated:

8 Express Trains To Halt : कोकण रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकांवर आठ एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्यात आला आहे

konkan railway
konkan railway
कोकणातील प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. सिंधुदुर्गनगरी आणि कणकवली रेल्वे स्थानकांवर आता आठ मेल-एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. त्यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी 2 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून 11 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल.
अनेक वर्षांनंतर प्रवाशांची मागणी अखेर मान्य
यापूर्वी अनेक गाड्या कोकणातून जात असल्या तरी सिंधुदुर्ग आणि कणकवली या मुख्य स्थानकांवर त्यांचा थांबा नव्हता. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा या थांब्यांची मागणी केली होती. अखेर रेल्वे प्रशासनाने ती मान्य केली आहे.
'या' एक्स्प्रेस गाड्यांना मिळाला थांबा!
सिंधुदुर्ग स्थानकावर गाडी क्रमांक 12977/78 मरूसागर एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक 22655/56 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस यांना प्रत्येकी दोन मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे तर कणकवली स्थानकावर गाडी क्रमांक 22475/76 हिसार-कोइंबतूर एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक 16335/36 गांधीधाम-नागरकोईल एक्स्प्रेस यांना थांबा देण्यात आला आहे.
advertisement
कोणत्या गाडीला कधी थांबा मिळणार? संपूर्ण यादी जाहीर!
1)सिंधुदुर्ग स्थानक:
गाडी क्रमांक 12977 – 2 नोव्हेंबरपासून
गाडी क्रमांक 12978 – 7 नोव्हेंबरपासून
गाडी क्रमांक 22655 – 5 नोव्हेंबरपासून
गाडी क्रमांक 22656 – 7 नोव्हेंबरपासून
2)कणकवली स्थानक:
गाडी क्रमांक 22475 – 5 नोव्हेंबरपासून
गाडी क्रमांक 22476 – 8 नोव्हेंबरपासून
गाडी क्रमांक 16335 – 7 नोव्हेंबरपासून
advertisement
गाडी क्रमांक 16336– 11 नोव्हेंबरपासून
advertisement
रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे की प्रवाशांनी तिकीट काढताना या नवीन थांब्यांची माहिती तपासावी आणि त्यानुसार प्रवासाची योजना करावी तसेच या निर्णयामुळे कोकणातील प्रवाशांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कोकण/
Konkan Railway : कोकण रेल्वेचा मोठा निर्णय! 8 गाड्यांना मिळाला थांबा; कधी होणार सुरू?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement