केसांच्या सौंदर्यापासून सांधेदुखीपर्यंत अत्यंत गुणकारी तेल, त्वचाही होते तजेलदार
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
सर्वसाधारणपणे थंडीत केस रखरखीत होतात. केसांमध्ये कोंडा होता. अशावेळी हे तेल वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
सोनिया मिश्रा, प्रतिनिधी
चमोली : मोहोरीमुळे फोडणीला एक खमंग वास येतो, पण मोहोरीचं तेल वापरायचं म्हटलं की, अनेकजणांच्या कपाळाला आट्या पडतात. परंतु अंगदुखीवर हे तेल रामबाण असतं. त्याचप्रमाणे बऱ्याचजणांना माहित नसेल पण जर्दाळूचं तेलही मालिशसाठी आणि काळ्याभोर घनदाट केसांसाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं. जर्दाळू म्हणजे एक पिवळसर नारंगी फळ.
उत्तराखंडच्या चमोली भागातील डॉक्टर रजत सांगतात की, या तेलामुळे केस मऊ आणि चमकदार होतात. यात अनेक व्हिटॅमिन्स असतात ज्यामुळे डोक्याला पोषण तत्त्व मिळतात. परिणामी केस गळत नाहीत.
advertisement
सर्वसाधारणपणे थंडीत केस रखरखीत होतात. केसांमध्ये कोंडा होता. अशावेळी हे तेल वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. जर्दाळूच्या तेलामुळे केसांना मॉइश्चरायर मिळतं. ज्यांचे केस लहान असतात त्यांनी हे तेल आवर्जून वापरावं कारण त्याचा थेट स्कॅल्पवर परिणाम होतो.
advertisement
जर्दाळूचं तेल केसांसह त्वचेसाठीही गुणकारी असतं. त्वचेसंबंधित सर्व समस्या त्यामुळे दूर होतात. चेहऱ्यावर डाग किंवा दाद असतील तर हे तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. केस आणि त्वचेचं आरोग्य राखण्यासह अंगदुखीवर हे तेल फायदेशीर असतं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
Location :
Chamoli,Uttarakhand
First Published :
Feb 15, 2024 10:29 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
केसांच्या सौंदर्यापासून सांधेदुखीपर्यंत अत्यंत गुणकारी तेल, त्वचाही होते तजेलदार









