सावधान! गॅस गिझर वापरताय, होऊ शकतो मृत्यू; डॉक्टरांनी सांगितले शॉकिंग साइड इफेक्ट्स
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
थंडीच्या दिवसांत गरम पाण्याने अंघोळ करण्यासाठी अनेक लोक गॅस गिझरचा वापर करतात. हे इलेक्ट्रिक गिझरपेक्षा स्वस्त आणि जलद गरम पाणी देतात. पण, या गिझरचा वापर करताना मोठी चूक केली, तर तुमचा जीव जाऊ शकतो.
Gas Geyser Side Effects On Health : थंडीच्या दिवसांत गरम पाण्याने अंघोळ करण्यासाठी अनेक लोक गॅस गिझरचा वापर करतात. हे इलेक्ट्रिक गिझरपेक्षा स्वस्त आणि जलद गरम पाणी देतात. पण, या गिझरचा वापर करताना मोठी चूक केली, तर तुमचा जीव जाऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, बंद बाथरूममध्ये गॅस गिझर वापरल्याने कार्बन मोनोऑक्साइडची विषबाधा होऊ शकते. डॉक्टर रिचा तिवारी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी अशीच एक घटना सांगितली आहे. ज्यामध्ये गॅस गिझरमुळे एका महिलेवर काय परिणाम झाला हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
गॅस गिझर वापरताना होणारे गंभीर परिणाम
कार्बन मोनोऑक्साइडची निर्मिती
गॅस गिझरमध्ये गॅसच्या अपूर्ण ज्वलनामुळे कार्बन मोनोऑक्साइड वायू तयार होतो. हा वायू रंगहीन आणि गंधहीन असल्याने तो ओळखता येत नाही.
'सायलेंट किलर'
कार्बन मोनोऑक्साइडला 'सायलेंट किलर' असेही म्हणतात. बाथरूम बंद असल्याने हा विषारी वायू बाहेर जात नाही आणि हळूहळू आतल्या व्यक्तीच्या शरीरात जातो.
advertisement
ऑक्सिजनची जागा घेतो
कार्बन मोनोऑक्साइड रक्तातील ऑक्सिजनची जागा घेतो. यामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी, व्यक्ती बेशुद्ध होते आणि गुदमरून तिचा मृत्यू होऊ शकतो.
विषबाधेची लक्षणे
या विषबाधेची सुरुवातीची लक्षणे डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ आणि खूप थकवा जाणवणे अशी असतात. अनेकदा लोक ही लक्षणे दुर्लक्ष करतात आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
advertisement
बाथरूममध्ये हवा खेळती ठेवा
गिझर वापरताना बाथरूमचे दार किंवा खिडकी नेहमी उघडी ठेवा, जेणेकरून हवा खेळती राहील आणि तयार झालेला वायू बाहेर निघून जाईल.
नियमित तपासणी
गिझरची नियमितपणे व्यावसायिक तपासणी करून घ्या. यामुळे गॅसची गळती किंवा ज्वलन योग्य होत आहे की नाही, हे कळेल. गॅस गिझर वापरताना थोडीशी निष्काळजीपणाही जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे, सुरक्षा उपायांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 12:48 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
सावधान! गॅस गिझर वापरताय, होऊ शकतो मृत्यू; डॉक्टरांनी सांगितले शॉकिंग साइड इफेक्ट्स