Benefits of Bay Leaf: तमालपत्राचे हे फायदे माहिती आहेत का ? रोजच्या वापराने जीभही होईल खूश आणि शरीरही राहील निरोगी

Last Updated:

Benefits of Bay Leaf: अनेक शारीरिक व्याधींवर तमालपत्र गुणकारी आहे. आयुर्वेदात उल्लेखल्यानुसार, विविध प्रकारच्या ॲलर्जींना दूर ठेवण्यात पासून ते कॅन्सर, डायबिटीस सारख्या गंभीर आजारांवर आणि मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी तमालपत्र फायदेशीर आहे.

प्रतिकात्मक फोटो : तमालपत्र
प्रतिकात्मक फोटो : तमालपत्र
मुंबई : भारतीय मसाले फक्त चवीपुरताच मर्यादीत नाहीयेत तर त्यांचे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. मसाले तुमच्या पदार्थांना रूचकर बनवण्यापासून, तुमच्या जीभेचे चोचले पुरवण्यापर्यंत तुमच्या आरोग्याची काळजी हे मसाले घेतात. असाच एक मसाल्याचा पदार्थ आहे, ‘तमालपत्र’. भाज्यांपासून पुलावाच्या विविध प्रकारांपर्यंत आणि शाकाहारीपासून ते विविध मासांहारी पदार्थांची चव वाढवण्यात तमालपत्र महत्त्वाची भूमिका बजावतं. अनेक शारीरिक व्याधींवर तमालपत्र गुणकारी आहे. आयुर्वेदात उल्लेखल्यानुसार, विविध प्रकारच्या ॲलर्जींना दूर ठेवण्यात तमालपत्र फायदेशीर ठरू शकतं. अगदी साथींच्या आजारापासून वाचवण्यापर्यंत ते मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी तमालपत्र फायदेशीर आहे.
एका अहवालात तमालपत्राचा उल्लेख औषधांची खाण असा केला गेलाय. तमालपत्रात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन सी असतात, जी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. या शिवाय तमालपत्रात अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. एखाद्या जखमेवर तमालपत्राच्या लावल्यास ती लवकर बरी होते. कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यातही तमालपत्र मदत करतं त्यामुळे हृदय स्वस्थ राहायला मदत होते. तमालपत्राच्या नैसर्गिक सुगंधने तणाव कमी होतो. ज्यामुळे तुमचं मन थाऱ्यावर यायला मदत होते. कधी तुम्ही फारच थकलेले, त्रासलेले असाल त्यावेळी एका पाण्यात तमालपत्र उकळवून त्याचा चहा घेतल्यास तुम्हाला फ्रेश वाटेल.
advertisement
तमापत्रात कॅटेचिन, लिनालूल आणि पार्थेनोलाइड्स सारखे अँटीऑक्सिडंट्सच्या असतात, ज्यामुळे शरीरांचं मुक्त रॅडिकल्स रक्षण होऊन कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला दूर ठेवायला मदत होते.शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून फेकण्यात तमालपत्र मदत करतं, ज्याचा फायदा लिव्हरला होऊन लिव्हर निरोगी राहायला मदत होते. तमालपत्रात असलेले एंझाइम्स पचन सुधारायला मदत करतात. त्यामुळे बद्धकोष्टता, अपचन, गॅसेस सारख्या समस्या दूर व्हायला मदत होते. तमालपत्रातल्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे शरीरातील जळजळ कमी होते. त्यामुळे ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी तमालपत्राचा चहा घेतल्यास त्यांचा ॲसिडिटीचा त्रास दूर होतो. तमालपत्राच्या नैसर्गिक सुगंधामुळे गुणधर्म सायनसच्या त्रासाला अटकाव केला जाऊ शकतो. तमालपत्रामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांसाठी तमालपत्र फायद्याचं आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Benefits of Bay Leaf: तमालपत्राचे हे फायदे माहिती आहेत का ? रोजच्या वापराने जीभही होईल खूश आणि शरीरही राहील निरोगी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement