Cardamom Health Benefits: काय सांगता! एक वेलची दूर ठेवेल कॅन्सर आणि हार्ट ॲटॅकला; जाणून घ्या वेलचीचे इतके फायदे
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Health Benefits Of Cardamom: वेलचीत अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या आवश्यक खनिजे असतात. त्यामुळे वेलचीचा वापर रोजच्या आहारात केला तर हार्ट ॲटॅक, कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना दूर ठेवता येऊ शकतं.
Cardamom Benefits: वेलची विविध वनस्पतींच्या बियाण्यांपासून बनवलेली लिंबूवर्गीय वनस्पती. चांगला उग्र वास आणि चवी मुळे चहापासून बिर्याणी पर्यंत आणि भाजीपासून मिठाई पर्यंत सर्रासपणे वेलचीचा वापर आणि वावर दिसून येतो. याला वेलदोडा या नावानेही ओळखलं जातं. वेलचीत अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या आवश्यक खनिजे असतात. त्यामुळे वेलचीचा वापर रोजच्या आहारात केला तर अनेक फायदे होऊ शकतात.
वेलची खाण्याचे आरोग्य फायदे
कॅन्सरवर गुणकारी
वेलचीत अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वेलची मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या हानीपासून पेशींचे संरक्षण करते. यामुळे कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होतो. शरीर आणि शरीरातल्या पेशी स्वस्थ राहिल्यामुळे अकाली म्हातारपण येण्याची प्रक्रिया मंदावते.
डायुरेटीक
शरीरातील विषारी घटक लघवीद्वारे बाहेर काढून टाकण्याचं काम किडनी करत असते. जर आपण वेलची खाल्ली तर वेलचीसुद्धा टाकाऊ आणि विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकालया मदत करते. ज्याचा फायदा किडनीला होतो. त्यामुळे यामुळे मूत्रपिंडाचे सुरळीत कार्यरत राहतात.
advertisement
तणाव कमी होतो
जर तुम्ही सतत तणावात असाल तर तुम्हाला वेलची खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. वेलची ही चांगली अँटीडिप्रेसंट आहे. वेलचीमुळे तणाव कमी होऊन मन शांत व्हायला मदत होते. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि तणाव दूर करण्यासाठीच्या पारंपरिक औषधांमध्ये वेलदोड्याचा वापर केला जातो.
advertisement
पचन सुधारतं
वेलची एंझाइम्सच्या त्या स्रावाला उत्तेजन देते जे पचनक्रियेला महत्त्वाची भूमिका बजावता. यामुळे पचनक्रिया सुधारून सूज, गॅस आणि पोटदुखी यासारख्या त्रासांवर आराम मिळतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
वेलचीतील आवश्यक तेलांमध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात, जे हानिकारक जीवाणू आणि विषाणूंशी लढण्यास मदत करतात. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते.
advertisement
कमी रक्तदाब
वेलदोड्याच्या नियमित सेवनामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि संबंधित हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो.
रक्ताभिसरण सुधारतं
वेलदोडा हा एक रक्त पातळ करणारा नैसर्गिक पदार्थ आहे. रक्त पातळ झाल्यामुळए रक्ताभिसरण चांगल होवून रक्त प्रवाह वाढवतो. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखलं जाऊ शकतं. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
advertisement
दाहक-विरोधी गुणधर्म
वेलचीत दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे सूज कमी करण्यास आणि संधिवात आणि दमा यासारख्या परिस्थितीशी संबंधित लक्षणे दूर करण्यास मदत करू शकतात. याशिवाय वेलचीच्या उग्रवासाने श्वासातली दुर्गंधी दूर होते.
वेलचीचे असंख्य फायदे असले तरीही ती गरम मसाल्याचा भाग असल्याने ती उष्ण प्रवृत्तीची मानली जाते. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून वेलचीचं सेवन माफक प्रमाणात केले पाहिजे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2024 3:05 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cardamom Health Benefits: काय सांगता! एक वेलची दूर ठेवेल कॅन्सर आणि हार्ट ॲटॅकला; जाणून घ्या वेलचीचे इतके फायदे


