Dragon Fruit Benefits: हृदयरोग्यांसाठी वरदान आहे ड्रॅगन फ्रुट, रक्त वाढेल, हाडंही होतील मजबूत, होतील बरेच फायदे

Last Updated:

Benefits of dragon fruit: बहुगुणकारी फळ या सोप्या शब्दात ड्रॅगन फ्रुटचा उल्लेख करावा लागेल. रक्तवाढीपासून ते हार्ट ॲटॅक पर्यंत आणि नितळ त्वचेपासून ते कॅन्सर रोखण्यापर्यंत ड्रॅगन फ्रुट फायदेशीर ठरतंय.

प्रतिकात्मक फोटो : हार्ट ॲटॅक ते कॅन्सरपर्यंतच्या गंभीर आजारांचा ‘कर्दनकाळ’
प्रतिकात्मक फोटो : हार्ट ॲटॅक ते कॅन्सरपर्यंतच्या गंभीर आजारांचा ‘कर्दनकाळ’
Dragon Fruit Benefits: बहुगुणकारी फळ या सोप्या शब्दात ड्रॅगन फ्रुटचा उल्लेख करावा लागेल. रोज हे फळ खाणाऱ्या व्यक्तीला 1, 2 नाही तर अनेक फायदे मिळणार आहे. रक्तवाढीपासून ते हार्ट ॲटॅक पर्यंत आणि नितळ त्वचेपासून ते कॅन्सर रोखण्यापर्यंत ड्रॅगन फ्रुट फायदेशीर ठरतंय. ड्रॅगन फ्रुटमध्ये  प्रोटीन, कार्ब्स, फायबर, लोह आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक आढळतात.

हृदयविकार, कॅन्सरवर गुणकारी

ड्रॅगन फ्रुटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यामुळे रक्तातलं वाईट कोलेस्टेरॉल वाढण्याचं प्रमाण कमी होतं. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. ड्रॅगन फ्रुटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फेनोलिक ॲसिड आणि बीटासायनिन यासारखे अँटी-ऑक्सिडंट्स आहेत, जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.शरीर आणि त्वचेचं फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो. ड्रॅगन फ्रुटमधील औषधी गुणधर्मांमुळे कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
advertisement

वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्यांय

ड्रॅगन फ्रुटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, यामुळे सारखी भूक लागत नाही. यामुळे अतिरिक्त कॅलरीज पोटात जाण्याची शक्यता कमी होऊन वजन नियंत्रणात येतं. सकाळी सकाळी रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रुट खाल्लं तर शरीराची पचनक्रिया सुरळीत होते.

आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

advertisement
आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रुट खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यात आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करणारे प्रोबायोटिक्स असतात.  प्रोबायोटिक्समुळे अन्न सहज पचायला मदत होते. यामुळे आतड्यांशी संबंधित समस्या आणि आजार कमी होतात. अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाशी संबंधित आजारांवर ड्रॅगन फ्रूट फायदेशीर आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये भरपूर फायबर आणि पाणी असतं. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांसाठी या फळाचे सेवन फायदेशीर ठरु शकते.
advertisement

रक्तवाढीस पोषक

ड्रॅगन फ्रुटमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. नियमित रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यास शरीरास लोहाचा पुरवठा होण्यास शरीरातील रक्ताची कमतरताही भरून निघेल. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळीही वाढेल.
advertisement

हाडं होतील मजबूत

ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. जे हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते. ड्रगन फ्रुटच्या सेवनाने हिरड्या आणि दातही मजबूत होतात. याशिवाय हे फळ डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे. याच्या सेवनाने मोतीबिंदू टाळता येतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dragon Fruit Benefits: हृदयरोग्यांसाठी वरदान आहे ड्रॅगन फ्रुट, रक्त वाढेल, हाडंही होतील मजबूत, होतील बरेच फायदे
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement