उन्हापासून त्वचेचं दररोज करा रक्षण; पार्लरमध्ये जायची वेळ नाही येणार, पैसे वाचतील!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
उन्हाळ्यात चेहऱ्यावरची चमक गायब होतेच, शिवाय पिंपल आणि डागही येतात. आज आपण उन्हाळ्यात त्वचेचं तेज आणि तुकतुकीतपणा टिकवून ठेवण्यासाठी एकदम सोपे उपाय जाणून घेणार आहोत.
अंजू प्रजापती, प्रतिनिधी
रामपूर : सूर्यकिरणांपासून व्हिटॅमिन D मिळतं, ज्यामुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणूनच लहान बाळांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना सकाळचं कोवळं ऊन घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. परंतु ऊन आरोग्यासाठी कितीही उपयुक्त असलं, तरी उन्हाळ्यात मात्र त्याचा त्रास होतो. त्वचा अगदी रापून निघते, चालताना, बोलताना धाप लागते, शरीर घामाघूम होतं. सर्वाधिक हाल त्वचेचेच होतात. कारण घराबाहेर पडल्यावर उन्हाच्या तीव्र झळांशी त्वचेचा थेट संपर्क येतो, तर घरात असताना खिडकीतून सूर्यकिरणं आत येतात. मग अशावेळी त्वचेची काळजी घेणं हा सर्वात मोठा टास्क असतो.
advertisement
उन्हाळ्यात चेहऱ्यावरची चमक गायब होतेच, शिवाय पिंपल आणि डागही येतात. आज आपण उन्हाळ्यात त्वचेचं तेज आणि तुकतुकीतपणा टिकवून ठेवण्यासाठी एकदम सोपे उपाय जाणून घेणार आहोत. डॉक्टर हैदर अली खान यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
डॉक्टरांनी सांगितलं की, त्वचेचं उन्हापासून शक्य तेवढं रक्षण करावं. घरातून बाहेर निघण्यापूर्वी चांगल्या दर्जाचं सनस्क्रीन क्रीम चेहऱ्यावर लावा. ज्यामुळे चेहऱ्याचं सूर्यकिरणांपासून रक्षण होईल. त्यानंतर हातांमध्ये सूती ग्लोव्ह्स घाला आणि चेहराही सूती कापडाने बांधा. शिवाय केसही झाकून घ्या.
advertisement
शरिराला गारवा मिळावा यासाठी थंड पाणी प्या, थंड पदार्थ खा. तुम्ही ऊसाचा किंवा इतर फळांचा रस पिऊ शकता. त्यामुळे शरिराचं तापमान नियंत्रित राहतं. डिहायड्रेशन कमी होतं. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत सूर्यकिरणं प्रचंड प्रखर असतात. या दरम्यान शक्यतो उन्हाच्या संपर्कात न येण्याचा प्रयत्न करा. सुरक्षित कपडे घालणं अत्यंत आवश्यक आहे. त्वचेवर काळसरपणा येऊ नये यासाठी पूर्ण अंग झाकेल असे कपडे घाला. टोपी आणि चष्म्याचा वापर करा.
advertisement
हेही वाचा : Curd vs Buttermilk : दही की ताक, उन्हाळ्यात शरीरासाठी काय जास्त फायदेशीर? – News18 मराठी (news18marathi.com)
घरी आल्यानंतर काय करावं?
उन्हातून घरी आल्यावर सर्वात आधी चेहरा स्वच्छ धुवा. खरंतर दिवसातून कमीत कमी दोनवेळा चेहरा धुवायलाच हवा. त्यासाठी तुमच्या त्वचेनुसार फेसवॉश वापरा. फेसवॉशशिवायही चेहऱ्यावर पाही मारा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडते, त्यामुळे झोपण्यापूर्वी फेसवॉश केल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावा.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
Location :
Rampur,Uttar Pradesh
First Published :
April 14, 2024 7:03 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
उन्हापासून त्वचेचं दररोज करा रक्षण; पार्लरमध्ये जायची वेळ नाही येणार, पैसे वाचतील!