Burning Mouth Syndrome: बर्निंग माऊथ सिंड्रोम म्हणजे काय? गंभीर आजाराची चाहूल; दुर्लक्ष जीवघेणं ठरू शकतं

Last Updated:

Burning Mouth Syndrome: बर्निंग माऊथ सिंड्रोम BMS हा तोंडात जळजळ निर्माण करणारा न्युरोपॅथिक आजार असून सुनंदा ताई यांना हार्मोन बदल, व्हिटॅमिन कमतरता व तणावामुळे त्रास झाला.

News18
News18
बर्निंग माऊथ सिंड्रोम (BMS) म्हणजे तोंडाच्या आत जळजळ होण्याची किंवा उष्णतेची जाणीव होणे. ही जळजळ जीभ, ओठ, तालू किंवा तोंडाच्या इतर भागात होऊ शकते. याला कधी कधी ग्लॉसोडायनिया असेही म्हणतात. ही समस्या तेव्हा होते जेव्हा तोंडातील नसा मेंदूकडे चव आणि तापमानाचे संदेश चुकीच्या पद्धतीने पोहोचवतात. मेंदू ते नीट समजू शकत नाही आणि त्यामुळे जळजळ किंवा वेदना जाणवू लागतात.
advertisement
तुमच्या तोंडात जळजळ जाणवली तरी त्या जागा खऱ्या अर्थाने गरम नसतात. दिसायला लालसरपणा किंवा जखमसुद्धा नसते. BMS हा न्युरोपॅथिक पेन मानला जातो. म्हणजे नसा दुखावल्यामुळे होणारी वेदना.
advertisement
BMS होण्याची कारणे
हार्मोनमधील बदल
ताण, चिंता किंवा नैराश्य
रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित समस्या
चव किंवा वेदना नियंत्रित करणाऱ्या नसांमध्ये त्रास
काही टूथपेस्ट किंवा माउथवॉशमुळे होणारी ऍलर्जी
व्यवस्थित न बसणारे डेंचर (खोटे दात) किंवा डेंचरच्या साहित्यामुळे होणारी ऍलर्जी
advertisement
काही आजारांमुळे BMS होऊ शकतो का?
हो, काही वैद्यकीय स्थितींमुळे BMS होऊ शकतो:
-तोंड कोरडे होणे
-अॅसिड रिफ्लक्स (पोटातील आम्ल तोंडात येणे)
-तोंडात होणारा फंगल इन्फेक्शन (कँडिडा/थ्रश)
-शरीरात आयर्न, व्हिटॅमिन B12 किंवा फॉलिक अॅसिडची कमतरता
advertisement
-डायबिटीज
-थायरॉइड समस्या
-कधी कधी यामागे एकापेक्षा जास्त कारणंही असू शकतात.
कोणाला जास्त त्रास होतो?
BMS कोणालाही होऊ शकतो; पण प्रामुख्याने मध्यमवयीन किंवा मेनोपॉज झालेल्या स्त्रियांमध्ये तो जास्त दिसतो.
लक्षणे काय असतात?
-जीभ, ओठ, हिरड्या, तालू किंवा गालाच्या आतील भागात जळजळ
advertisement
-काहींना सकाळी सुरुवात होऊन संध्याकाळपर्यंत त्रास वाढतो, तर काहींना सतत जाणवतो
-सुन्नपणा, मुंग्या येणे
-तोंडात कडवट किंवा धातूसारखी चव
-तोंड कोरडे किंवा दुखरे वाटणे
हे जणू काही तुम्ही गरम अन्न किंवा पेयामुळे तोंड भाजल्यासारखं वाटतं.
advertisement
निदान कसे केले जाते?
1)दंतचिकित्सक तोंड तपासून कारण शोधतात
2)वैद्यकीय इतिहास पाहतात आणि गरज वाटल्यास डॉक्टरकडे पाठवतात
3) रक्त तपासण्या, स्वॅब चाचण्या किंवा ऍलर्जी टेस्ट होऊ शकतात
4)थायरॉइड किंवा डायबिटीज तपासण्यासाठी अतिरिक्त रक्त तपासण्या कराव्या लागतात
उपचार काय आहेत?
यासाठीचे उपचार कारणांवर अवलंबून असतात:
-आहारातील कमतरतेसाठी सप्लिमेंट्स
-डेंचरमध्ये बदल किंवा फंगल इन्फेक्शनसाठी औषधं
-ताण-तणाव कमी करण्यासाठी समुपदेशन, सौम्य अँटीडिप्रेसंट्स
-कोरडे तोंड (औषधांचा साइड इफेक्ट) असल्यास डॉक्टर औषधं बदलू शकतात
-योगा, ध्यान, रिलॅक्सेशन थेरपीनेही काहींना आराम मिळतो
स्वतः लक्षणे कमी करण्याचे उपाय
1)वारंवार पाणी पिणे
2)बर्फाचे छोटे तुकडे चोखणे
3)शुगर-फ्री च्युइंग गम खाणे (लाळ वाढते, कोरडेपणा कमी होतो)
4)खूप गरम किंवा मसालेदार अन्न टाळणे
5)अल्कोहोलयुक्त माउथवॉश, आम्लीय फळे-रस टाळणे
6)तंबाखू आणि मद्य टाळणे
किती काळ टिकतो?
BMS चे कारण निश्चित माहित नसल्याने तो दीर्घकाळ टिकू शकतो. काही महिने, काही वर्षे किंवा आयुष्यभर. पण योग्य उपचार, थेरपी आणि स्वतःच्या पद्धतीने लक्षणे कमी करण्याचे उपाय केल्यास जीवन सामान्य ठेवता येते.
दीर्घकालीन त्रास 
सततची जळजळ आणि वेदना नैराश्य आणू शकते. त्यामुळे डॉक्टर कधी कधी अँटीडिप्रेसंट्स किंवा Cognitive Behavioural Therapy सुचवतात.
बर्निंग माऊथ सिंड्रोम सुनंदा ताईंची कहाणी
"माझं तोंड सतत जळतंय असं वाटतंपण डॉक्टर, खरं तर तोंडात कुठेही जखम नाही, लालसरपणाही नाही." हे शब्द होते सुनंदा ताईंचे. वयाच्या पन्नाशीपुढे गेलेल्या सुनंदा ताई गेल्या काही महिन्यांपासून एका विचित्र त्रासाने त्रस्त होत्या. सकाळपासून जीभ आणि ओठांमध्ये जळजळ सुरू व्हायची आणि संध्याकाळपर्यंत ती वाढतच जायची. कधी कधी तोंड कडवट लागायचं, तर कधी धातूसारखी चव यायची.
डॉक्टरांनी त्यांना सांगितलं  हा आजार बर्निंग माऊथ सिंड्रोम (BMS) म्हणून ओळखला जातो. म्हणजे तोंडात जळजळ जाणवते, पण प्रत्यक्षात तोंड गरम नसतं किंवा कुठेही जखम दिसत नाही
ही समस्या नसांच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे होते. म्हणजेच जीभ किंवा तोंडातून मेंदूकडे जाणारे संदेश (चव, तापमान) नीट पोहोचत नाहीत आणि मेंदूला वेदना किंवा जळजळ वाटू लागते.
हा त्रास कोणाला जास्त होतो?
BMS कोणालाही होऊ शकतो, पण तो जास्त करून मध्यमवयीन किंवा मेनोपॉजमधील स्त्रियांमध्ये दिसतोडॉक्टरांनी काही शक्यता सांगितल्या. ज्यात हार्मोन बदल, ताण, चिंता किंवा नैराश्य, रोगप्रतिकारक शक्तीतील बिघाड,टूथपेस्ट किंवा माउथवॉशमुळे ऍलर्जी,व्यवस्थितबसणारे डेंचर, शरीरात आयर्न, व्हिटॅमिन B12 किंवा फॉलिक अॅसिडची कमतरता आणि डायबिटीज किंवा थायरॉइडचे विकार यांचा समावेश होतो. 
सुनंदा ताईंना असे निदान झाले?
सुरुवातीला त्यांना वाटलं हा त्रास अॅसिडिटीमुळे असेल. पण तपासणी केली तर तोंडात कुठलीही जखम नव्हती. डॉक्टरांनी रक्त तपासण्या केल्या, काही व्हिटॅमिनची कमतरता आढळली आणि त्यावर उपाय सुचवला.
उपचार काय आहेत?
-व्हिटॅमिन सप्लिमेंट्स
-डेंचरमधील बदल
-गरज वाटल्यास फंगल इन्फेक्शनसाठी औषधं
-ताण कमी करण्यासाठी समुपदेशन किंवा योगा-मेडिटेशन
-कधी कधी सौम्य अँटीडिप्रेसंट्स
डॉक्टरांनी सुनंदा ताईंना काही घरगुती उपाय सांगण्यात आले. ज्यात वारंवार पाणी पिणं, बर्फाचे तुकडे चोखणं, शुगर-फ्री च्युइंग गम खाणं, गरम- मसालेदार आणि आम्लीय पदार्थ टाळणं, तंबाखूमद्य टाळणं. 
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Burning Mouth Syndrome: बर्निंग माऊथ सिंड्रोम म्हणजे काय? गंभीर आजाराची चाहूल; दुर्लक्ष जीवघेणं ठरू शकतं
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement