केकवरची चेरी फक्त दिसायला सुंदर नाही, त्यात असतं व्हिटॅमिन C, फायदे वाचाच!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
पुरेशी झोप मिळण्यापासून हॉर्मोन्स संतुलित राहण्यापर्यंत विविध समस्यांवर चेरी गुणकारी असते. चेरीच्या सेवनाने शरीर सुदृढ राहतं.
आशीष त्यागी, प्रतिनिधी
बागपत : केकवरची लालचुटुक चेरी पाहून आपल्या जिभेला पाणी सुटतं. पाहूनच चेरी खावीशी वाटते. परंतु तुम्हाला माहितीये का, चेरी फक्त दिसायला आणि चवीला स्वादिष्ट नसते, तर औषधी गुणांनी परिपूर्णही असते.
चेरीमध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असतं. शिवाय त्यातून अँटीऑक्सिडंटही चांगल्या प्रमाणात मिळतं. हृदयाचं आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी, त्यासंबंधातले विकार दूर करण्यासाठी चेरी उपयुक्त असते. शिवाय मेंदूसाठीदेखील चेरी उत्तम मानली जाते, त्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते.
advertisement
डॉक्टर राघवेंद्र चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरेशी झोप मिळण्यापासून हॉर्मोन्स संतुलित राहण्यापर्यंत विविध समस्यांवर चेरी गुणकारी असते. चेरीच्या सेवनाने शरीर सुदृढ राहतं. दररोज चेरी खाल्ल्यास हृदयासंबंधित समस्या दूर होतात. आयुर्वेदात चेरीचा उल्लेख हृदयासाठी वरदान असा करण्यात आला आहे. पोटासाठीदेखील हे फळ उपयुक्त असतं.
advertisement
चेरी म्हणजे आरोग्याचा खजिना!
चेरी नुसती खावी असं काही नाहीये. तुम्ही रात्री ती दुधात भिजवून सकाळी उपाशीपोटी किंवा दिवसभरात कधीही खाऊ शकता. विशेष म्हणजे चेरीमुळे केवळ शारीरिक आरोग्य चांगलं राहत नाही, तर मानसिक आरोग्यही सुदृढ राहतं.
advertisement
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
Location :
Baghpat,Uttar Pradesh
First Published :
February 10, 2024 7:32 PM IST