Pregnancy Tips : गर्भधारणेत रोज नारळपाणी प्यावं का? डॉक्टर काय सांगतात? जाणून घ्या फायदे-तोटे

Last Updated:

प्रेग्नंसीशी संबंधित गुंतागुंतींचा धोका कमी करतो. अशा आहारात नारळपाणी एक नैसर्गिक आणि फायदेशीर पर्याय मानला जातो.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : गर्भधारणेच्या काळात स्त्रीच्या शरीरात अनेक शारीरिक आणि हार्मोनल बदल होत असतात. वजन आणि पोट वाढणं हे तर सामान्य आहे. या काळात आईचं आणि बाळाचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी संतुलित आणि पोषक आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. असा आहार नुसताच बाळाच्या विकासात मदत करत नाही, तर प्रेग्नंसीशी संबंधित गुंतागुंतींचा धोका कमी करतो. अशा आहारात नारळपाणी एक नैसर्गिक आणि फायदेशीर पर्याय मानला जातो.
नारळपाणी सौम्य गोडसर चव असलेलं, थंडावा देणारं आणि पौष्टिक पेय आहे. शिवाय नारळाला अमृताचा दर्जा दिला जातो, त्यामुळे तो सहाजिकच आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. यामध्ये नॅचरल इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीरातील पाण्याची कमतरता होऊ देत नाहीत. याशिवाय, त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडियमसारखे पोषक घटक असतात, जे थकवा आणि इतर शारीरिक तक्रारी दूर ठेवण्यास मदत करतात.
advertisement
दररोज नारळपाणी पिणं योग्य आहे का?
MBBS, MD (स्त्रीरोगतज्ज्ञ) डॉ. अंजली कुमार सांगतात की, दररोज एक छोटा ग्लास नारळपाणी पिणं सामान्यतः सुरक्षित मानलं जातं. मात्र, गर्भावस्थेत फक्त एकच प्रकारचं पेय नियमित घेणं टाळावं. आहारात विविधता असणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्व प्रकारचे पोषक तत्त्वं मिळू शकतील.
नारळपाण्याशिवाय इतर आरोग्यदायी पर्याय काय?
लिंबूपाणी, ताजं टरबूजाचं रस, लस्सी, ताक, कमी साखर असलेला आंबा शेक, सत्तू ड्रिंक इत्यादी सारखे रस पिऊ शकता.
advertisement
डायबेटीस असल्यास घ्या काळजी
जर गर्भधारणेदरम्यान साखरेची समस्या असेल, तर नारळपाणी मर्यादित प्रमाणातच प्यावं. कारण यात नैसर्गिक साखर असते. जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरातून आवश्यक मीठं बाहेर जाऊ शकतात.
डॉ. कुमार यांचं मत आहे की, गर्भधारणेदरम्यान आहारात फळं, भाज्या, संपूर्ण धान्यं, सत्वयुक्त प्रथिने आणि चांगल्या चरबीचं संतुलन असणं आवश्यक आहे. हे सर्व घटक आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक ऊर्जा, जीवनसत्त्वं आणि खनिजं पुरवतात.
advertisement
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pregnancy Tips : गर्भधारणेत रोज नारळपाणी प्यावं का? डॉक्टर काय सांगतात? जाणून घ्या फायदे-तोटे
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement