Coffee Dangers : रिकाम्यापोटी कॉफी पिणं म्हणजे पोटाला अॅसिड बाथ देणं! तज्ज्ञांनी सांगितले गंभीर दुष्परिणाम
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Morning coffee side effects : बरेच लोक सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी कॉफी पितात. काहीच न खाता रिकाम्यापोटी कॉफी पितात. पण ही पद्धत अतिशय चुकीची आहे.
मुंबई : बहुतांश लोकांना रोज सकाळी चहा किंवा कॉफी प्यायला आवडते. किंबहुना त्याशिवाय त्यांचा दिवस सुरूच होत नाही. त्यातही आता लोक आरोग्याच्या कारणाने चहापेक्षा ब्लॅक कॉफी पिणं पसंत करतात. अशा लोकांना कॉफीचं जणू व्यसनच लागतं. ब्लॅक कॉफी खरं तर आपल्या आरोग्यासाठी चांगली असते. ती पिणं वाईट नाही. फक्त ती योग्यवेळी पिली गेली पाहिजे.
बरेच लोक सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी कॉफी पितात. काहीच न खाता रिकाम्यापोटी कॉफी पितात. पण ही पद्धत अतिशय चुकीची आहे. ब्लॅक कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण जेव्हा तुम्ही कॉफी रिकाम्यापोटी पिता, तेव्हा तिचे फायदे होण्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. डॉ. कार्तिक सहानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबद्दल माहिती दिलीय.
advertisement
डॉक्टरांनी सांगितले रिकाम्यापोटी कॉफी पिण्याचे दुष्परिणाम..
डॉ. कार्तिक यांनी सांगितलं की, बरेच लोक पचनक्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारेल या आशेने रोज दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफी घेऊन करतात. मात्र यामुळे फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकतं. कारण काही लोकांनी रिकाम्यापोटी कॉफी प्यायल्यास त्यांच्या पोटाच्या आतील आवरणाला त्रास होऊ शकतो आणि ॲसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रायटीसची समस्या वाढू शकते.
advertisement
डॉक्टरांनी सांगितलं काही लोकांना हा त्रास हाऊ शकतो. विशेषतः ज्या लोकांना आधीपासूनच ॲसिडिटी किंवा जीईआरडी (GERD) चा त्रास आहे. त्याचबरोबर जी लोकं वेळेवर आणि व्यवस्थित जेवत नाहीत, जास्त ताण घेतात आणि खूप जास्त प्रमाणात कॅफीन घेतात, त्यांना हे त्रास होण्याची शक्यता जास्त असते. असाल लोकांनी रिकाम्यापोटी कॉफी अजिबात पिऊ नका.
advertisement
कॉफी प्यायल्यानंतर तिच्यामुळेच तुम्हाला त्रास होतोय हे तुम्हाला काही लक्षणांद्वारे ओळखता येऊ शकते. तुम्हाला जर पोटाच्या वरच्या भागात जळजळ होत असेल, मळमळ किंवा आंबट ढेकर येत असतील, सकाळी सकाळी ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर याचा अर्थ तुम्हाला सकाळी रिकाम्यापोटी प्यायलेल्या कॉफीमुळेच हा त्रास होत आहे.
advertisement
डॉक्टरांनी हे अधोरेखित करून सांगितलं की, कॉफी पिणं हे त्रासाचं कारण नाही. ब्लॅक कॉफी तुमच्यासाठी फायद्याचीच असते. मात्र जेव्हा तुम्ही कॉफी रिकाम्यापोटी पिता तेव्हा ती तुम्हाला त्रास देऊ शकते. म्हणूनच रिकाम्यापोटी कॉफी पिऊ नका, जेवणानंतरच कॉफी प्या, कॉफी नेहमी प्रमाणात प्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाश्त्याऐवजी कॅफीन घेऊ नका.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 12:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Coffee Dangers : रिकाम्यापोटी कॉफी पिणं म्हणजे पोटाला अॅसिड बाथ देणं! तज्ज्ञांनी सांगितले गंभीर दुष्परिणाम








