advertisement

Excessive Sweat : तुम्हालाही खूप घाम येतो का? या 5 आजारांचे असू शकते लक्षण, दुर्लक्ष टाळा..

Last Updated:

काही लोकांना व्यायामानंतर घाम येतो. हे चिंतेचे कारण नाही. परंतु, तुम्हाला हलके कष्ट करूनही घाम येऊ लागला किंवा बाहेर पडताच तुम्ही घामाने भिजत असाल तर ती सामान्य गोष्ट नाही. कारण त्याची अनेक गंभीर कारणे असू शकतात.

News18
News18
मुंबई : उन्हाळयात घाम येणं ही सामान्य गोष्ट आहे. मात्र खूप जास्त प्रमाणात घाम येत असेल तर ही वेगळी समस्या असू शकते. काही लोकांना व्यायामानंतर घाम येतो. हे चिंतेचे कारण नाही. परंतु, तुम्हाला हलके कष्ट करूनही घाम येऊ लागला किंवा बाहेर पडताच तुम्ही घामाने भिजत असाल तर ती सामान्य गोष्ट नाही. कारण त्याची अनेक गंभीर कारणे असू शकतात.
अगदी कॅन्सरमुळेही शरीरात जास्त घाम येऊ शकतो. शरीरात जास्त घाम येणे या आजाराला हायपरहायड्रोसिस म्हणतात. मात्र, अति उष्णतेमुळे किंवा अतिव्यायाममुळे येत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला इतका घाम येत असेल की, तुमचे कपडे ओले होत असतील आणि तुम्हाला ते तुमच्या हातांनी पुसावे लागत असतील, तर ही बाब चिंताजनक आहे.
advertisement
अति घामाचे दुष्परिणाम..
शरीराला थंड राहावे यासाठी आपल्या शरीरातून घाम बाहेर येतो. जेव्हा शरीराचे तापमान वाढते तेव्हा मज्जासंस्था आपोआप घाम ग्रंथींना घाम निर्माण करण्याचा संदेश देते. आजारपणामुळे या मज्जातंतूमध्ये समस्या निर्माण होते, ज्यामुळे घामाच्या ग्रंथींमधून जास्त घाम येऊ लागतो. याला अनेक रोग कारणीभूत ठरू शकतात. जर मधुमेह असेल तर अशा स्थितीत या नसांना इजा होऊ शकते. याशिवाय, स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर ते हॉट फ्लॅशच्या स्वरूपात देखील दिसू शकते. याशिवाय काही कॅन्सर, थायरॉइडची समस्या, मज्जासंस्था बिघडणे आणि संसर्ग झाल्यास जास्त घाम येऊ शकतो.
advertisement
कधी ठरू शकते जास्त घातक?
जास्त घाम आल्याने तुमचा दिवस खराब होत असेल आणि तुमच्या दिनचर्येवर परिणाम होत असेल तर त्याला हलक्यात घेऊ नका. असे झाल्यास डॉक्टरकडे जा. तुम्हाला सामान्य दिवसांपेक्षा जास्त घाम येतो आणि रात्रीही घाम येणे थांबत नाही, अशा परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
advertisement
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Excessive Sweat : तुम्हालाही खूप घाम येतो का? या 5 आजारांचे असू शकते लक्षण, दुर्लक्ष टाळा..
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement