Success Story : अहिल्यानगरच्या 3 तरुणांनी बनला पिझ्झाचा ब्रँड, विकतायत 40 प्रकार, वर्षाला 36 लाख कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Aishwarya Ramnath Taskar
Last Updated:
अहिल्यानगर येथील राहता तालुक्यातील तीन तरुणांनी पिझ्झा हँगआऊट नावाचा ब्रँड सुरू केला आहे. या व्यवसायातून हे तीन मित्र वर्षाकाठी 36 लाख उत्पन्न घेतात.
अहिल्यानगर : सध्या अनेक तरुण व्यवसायाकडे वळताना पाहिला मिळत आहेत. अहिल्यानगर येथील राहता तालुक्यातील तीन तरुणांनी पिझ्झा हँगआऊट नावाचा ब्रँड सुरू केला आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य प्रत्येकास सहज घेता येऊ शकेल अशा किंमतीत म्हणजेच फक्त 69 रुपयांत त्यांच्याकडे पिझ्झा मिळतो. या व्यवसायातून हे तीन मित्र वर्षाकाठी 36 लाख उत्पन्न घेतात.
अरविंद बनकर, प्रसाद तासकर आणि आशिष गुंजाळ असे या तरुणाची नावे आहेत. त्यांच्याकडे ड्युलेक्स पिझ्झा, चीज पनीर, स्पायसी पनीर, ट्रॅडिशनल चीज पिझ्झा, स्पेशल पनीर पिझ्झा, असे जवळपास 40 प्रकारचे पिझ्झा उपलब्ध आहेत. तसेच व्हेज बर्गर, नॉनव्हेज बर्गरचे जवळपास 12 प्रकार उपलब्ध आहेत, सँडविचमध्ये 6 प्रकार उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे कोल्ड्रिंक्स, कोल्ड कॉफी आणि मिल्क शेक उपलब्ध आहेत.
advertisement
सुरुवातीला त्यांनी जवळपास 6 लाखापर्यंत गुंतवणूक करून या व्यवसायाला सुरुवात केली. तसेच क्वालिटीवर भर देत रेस्टॉरंटमध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाते. पिझ्झासाठी वापरले जाणारे मटेरियल चांगल्या क्वालिटीचे तसेच फ्रेश वापरले जाते. 2 किलोमीटर अंतरावर ते फ्री डिलिव्हरी देतात.
advertisement
या व्यवसायातून आम्हाला वर्षाकाठी 36 लाख रुपये मिळतात. आयुष्यात मोठं काही करायचं असेल तर रिस्क ही घेतलीच पाहिजे. तसेच गरजू तरुणांसाठी यातून त्यांनी रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या आहेत, असं आशिष गुंजाळ यांनी सांगितलं.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
May 19, 2025 2:40 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Success Story : अहिल्यानगरच्या 3 तरुणांनी बनला पिझ्झाचा ब्रँड, विकतायत 40 प्रकार, वर्षाला 36 लाख कमाई