Blood Donation : मित्राचा अपघात डोळ्याने पाहिला, आतापर्यंत 62 वेळा केलं रक्तदान, नावावरती 2 वर्ल्ड रेकॉर्ड
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
असं म्हणतात की रक्तदान करणं हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण सर्वांनी रक्तदान हे करायला हवं.
छत्रपती संभाजीनगर : असं म्हणतात की रक्तदान करणं हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण सर्वांनी रक्तदान हे करायला हवं. आपण जर रक्तदान केलं तर आपल्यामुळे तीन व्यक्तींचा जीव हा वाचू शकतो. त्यामुळे हे रक्तदान करणं आवश्यक आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर शहरातील ॲडव्होकेट अक्षय बाहेती यांनी देखील रक्तदान करायला सुरुवात केली आणि आत्तापर्यंत त्यांच्या नावावरती दोन वर्ल्ड रेकॉर्ड देखील झालेले आहेत.
शहरातील अक्षय बाहेती यांनी वयाच्या 18 वर्षांपासून रक्तदान करायला सुरुवात केली. रक्तदान करायची प्रेरणा ही त्यांना त्यांच्या मित्राचा जेव्हा अपघात झाला तेव्हा मिळाली. जेव्हा त्यांच्या मित्राचा अपघात झाला तेव्हा त्यांना रक्तासाठी खूप फिरावे लागलं पण रक्त हे भेटत नव्हतं त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण सुद्धा रक्तदान करायचं. तेव्हा त्यांचं वय हे 17 वर्षे होते. जेव्हा ते 18 वर्षांचे झाले तेव्हापासून त्यांनी रक्तदान करायला सुरुवात केली आणि आत्तापर्यंत त्यांनी 62 वेळापेक्षा जास्त रक्तदान हे केलेलं आहे.
advertisement
अक्षय यांच्या नावावर कमी वयात विश्वविक्रम करण्याचा रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे. ज्यामध्ये इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 31 वर्षांत 50 वेळा रक्तदान केल्याची नोंद झाली आहे. तर, वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये थालेसिमिया रुग्णांसाठी सर्वाधिक 58 वेळा रक्तदान केल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्याच्या या कार्यामुळे त्याला युनायटेड रिसर्च कौन्सिल (USA) तर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल राज्य सरकारच्या वतीनं प्रशस्तीपत्रक देण्यात आलेलं आहे.
advertisement
मी सर्वांना हे सांगू इच्छितो की आपण सर्वांनी रक्तदान हे करायला हवं. कारण की यामुळे तीन जणांचा जीव वाचू शकतो. मी विशेष करून थालेसिमिया रुग्णांसाठी रक्तदान करतो कारण की त्यांना महिन्यातून पंधरा दिवसांतून एकदा पूर्ण रक्त आहे बदलावं लागतं. आणि त्यामुळे मी महिन्याला एकदा रक्तदान करत असतो. तर आपण देखील रक्तदान करायला हवं, असं अक्षय यांनी सांगितलं आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
October 07, 2025 4:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Blood Donation : मित्राचा अपघात डोळ्याने पाहिला, आतापर्यंत 62 वेळा केलं रक्तदान, नावावरती 2 वर्ल्ड रेकॉर्ड