advertisement

दिल्लीतील कुल्हड पिझ्झा आता मिळणार अमरावतीमध्ये, किंमत फक्त 59 रुपये, पाहा Video

Last Updated:

अमरावतीमधील खवय्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. दिल्लीतील कुल्हड पिझ्झा आता अमरावतीमध्ये मिळणार आहे. 

+
News18

News18

प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : पिझ्झा खायला अनेकांना आवडतो. त्यात जर कुल्हड पिझ्झा मिळत असेल तर पाहिलाच नको. अश्या ठिकाणी खवय्यांची मोठी गर्दी असते. अमरावतीमधील गाडगेनगर येथील चौपाटी परिसरात शेगाव नाका रोड येथे आयुष शावरे यांनी कुल्हड पिझ्झाचे नवीन स्टॉल सुरू केले आहे. जिथे तुम्हाला 59 रुपयांत कुल्हड पिझ्झा मिळेल. आयुष शावरे यांनी ही संकल्पना दिल्ली येथून आणलेली आहे. कुल्हड पिझ्झा रेसिपी सुद्धा त्यांनी दिल्ली येथेच शिकलेली आहे. त्यामुळे अमरावतीमधील खवय्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. दिल्लीतील कुल्हड पिझ्झा आता अमरावतीमध्ये मिळणार आहे.
advertisement
अमरावतीमधील गाडगे नगर परिसरात असलेलं कुल्हड पिझ्झाचे स्टॉल गेल्या 2 महिन्यापासून सुरू झालेले आहे. आयुष शावरे यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला तेव्हा ते सांगतात की, मी दिल्लीमध्ये कुल्हड पिझ्झा बघितला होता आणि तो मला युनिक वाटला. मग मी विचार केला आपल्या अमरावतीमध्ये नक्की चालेल, ट्राय करून बघुया.
advertisement
ही संकल्पना मला दिल्ली येथे सुचली, त्यामुळे मी तिथूनच कुल्हड पिझ्झा शिकून घेतला आणि गेले 2 महिने हा स्टॉल लावलाय. यातून मला बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे. दिवसाला माझे 30 ते 40 पिझ्झा विकले जातात. अमरावतीमधील लोकांना कुल्हड पिझ्झाची टेस्ट आवडायला लागली आहे. मला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे.
पुढे ते सांगतात, या पिझ्झामध्ये आम्ही बेस पिझ्झामध्ये वापरतात तेच सर्व साहित्य वापरतो, फक्त पिझ्झा बेस वापरत नाही. त्याऐवजी आणि स्लाइस ब्रेड वापरतो. पिझ्झा बेस हा पचायला कठीण जातो, ब्रेड आपण डेली सुद्धा खाऊ शकतो, असा विचार करून आम्ही हा स्टॉल इथे सुरू केलाय. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिथिन वापरल्या पेक्षा मातीच्या भांड्यातील अन्न हे केव्हाही बेस्ट आहे.
advertisement
त्यामुळे कुल्हड पिझ्झा ही संकल्पना मला खूप आवडली. त्याचबरोबर टेस्ट ही बेस पिझ्झा सारखीच येणार पण किंमत मात्र कमी आहे. 59 रुपयांत कुल्हड पिझ्झा आम्ही विकत आहोत. गाडगेनगर येथे तोटे नेत्रालयाच्या समोर कुल्हड पिझ्झाचे आमचे स्टॉल आहे, असे त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/Food/
दिल्लीतील कुल्हड पिझ्झा आता मिळणार अमरावतीमध्ये, किंमत फक्त 59 रुपये, पाहा Video
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement