Famous Faluda : उन्हाळा असो की हिवाळा, इथला फालुदा खायला नेहमीच असते गर्दी, पुण्यातील 50 वर्षे फेमस ठिकाण
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
1973 साली सुरू झालेलं हे ठिकाण आजही घरगुती कुल्फी फालुदा, रबडी आणि पारंपरिक आईस्क्रीमसाठी ओळखलं जातं. पिढ्यानपिढ्या टिकवलेली गुणवत्ता, चव आणि घरगुती पद्धतीने तयार होणारे पदार्थ हे या व्यवसायाचं खास वैशिष्ट्य आहे.
पुणे : पुणे शहर म्हणजे इतिहास, संस्कृती आणि खास चवीचा संगम आहे. याच पुण्यातील एक अविभाज्य भाग म्हणजे कॅम्प परिसरातील ग्रेट पूना कोल्ड ड्रिंक हाऊस. 1973 साली सुरू झालेलं हे ठिकाण आजही घरगुती कुल्फी फालुदा, रबडी आणि पारंपरिक आईस्क्रीमसाठी ओळखलं जातं. पिढ्यानपिढ्या टिकवलेली गुणवत्ता, चव आणि घरगुती पद्धतीने तयार होणारे पदार्थ हे या व्यवसायाचं खास वैशिष्ट्य आहे. ग्राहकांना केवळ खाद्यपदार्थ नव्हे, तर आठवणींचा आणि परंपरेचा स्वाद इथे मिळतो.
पुणे कॅम्पमधील सचापीर स्ट्रीटवर वसलेलं ग्रेट पूना कोल्ड ड्रिंक हाऊस 1973 पासून ग्राहकांची चव सांभाळत आहे. तब्बल 52 वर्षांपूर्वी मनोज यांच्या वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय आजही तितक्याच प्रेमाने आणि सातत्याने पुढे चालवला जातोय. या ठिकाणचं मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक चव असलेले घरगुती कुल्फी फालुदा, रबडी आणि जुने काळातलं चविष्ट आईस्क्रीम. काळानुसार अनेक बदल झाले, पण या ठिकाणी मिळणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता आणि चव मात्र आजही तशीच टिकून आहे. पूर्वी केवळ 50 पैसे ते 2 आण्यांमध्ये मिळणारा फालुदा आज 100 ते 180 रुपये या दरात मिळतो. तरीही ग्राहकांची गर्दी आजही तितकीच दिसते. गेली दोन पिढ्या झालं हा व्यवसाय आम्ही चालवतो आहोत.
advertisement
येथे विविध प्रकारचे फालुदे मिळतात. आईस्क्रीम फालुदा, कुल्फी फालुदा, आणि दोन्हींचं अनोखं मिश्रण असलेला कॉकटेल फालुदा. ही सर्व पूर्णपणे होममेड असतात. याशिवाय, सुमारे 15 वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आईस्क्रीम उपलब्ध आहे. फक्त गोड पदार्थच नव्हे, तर मिल्कशेक, मस्तानी आणि लस्सी असे पारंपरिक पेयही येथे मिळतात, अशी माहिती व्यवसायिक मनोज दुनवानी यांनी दिली आहे.
advertisement
ग्रेट पूना कोल्ड ड्रिंक हाऊस हे केवळ खाद्यपदार्थाचं ठिकाण नाही, तर पुण्याच्या गोड आठवणींचा आणि चविष्ट वारशाचा एक भाग बनलं आहे. जुन्या काळातल्या चव आणि आताच्या वेळेचा अनुभव एकत्र आणणारा हा गोड कोपरा अजूनही पुणेकरांच्या मनात तसाच खास स्थान राखून आहे. तुम्हीही कधी गेलात, तर एकदा हा पारंपरिक आईस्क्रीमचा स्वाद नक्की अनुभवावा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 05, 2025 3:49 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Famous Faluda : उन्हाळा असो की हिवाळा, इथला फालुदा खायला नेहमीच असते गर्दी, पुण्यातील 50 वर्षे फेमस ठिकाण