Instant Dosa : सकाळच्या गडबडीतही झटपट होईल नाश्ता, न आंबवता बनवा इन्स्टंट स्पंज डोसा! पाहा रेसिपी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Instant Sponge Dosa Recipe In Marathi : आज आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी आहे, इन्स्टंट स्पंज डोसाची. ही रेसिपी sumiscookingcorner_yt या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला पाहूया ही इन्स्टंट रेसिपी.
मुंबई : सकाळच्या घाईगडबडीत स्वयंपाक करताना बऱ्याचदा नाश्ता वेगळा बनवण्यासाठी वेळच मिळत नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी आहे, इन्स्टंट स्पंज डोसाची. ही रेसिपी sumiscookingcorner_yt या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला पाहूया ही इन्स्टंट रेसिपी.
इन्स्टंट स्पंज डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- पोहे
- रवा
- दही
- पाणी
- गाजर
- बीन्स
- शिमला मिरची
- मटार
- मीठ
- तेल
इन्स्टंट स्पंज डोसा बनवण्याची सोपी पद्धत..
- सर्वात आधी पोहे चांगले धुवून घ्या.
- त्यानंतर हे पोहे आणि रवा मिक्सरच्या भांड्यात घ्या.
- त्यामध्ये दही आणि पाणी घालून ते बारीक वाटून घ्या.
advertisement
- आता हे बाऊळांध्ये काढा आणि योग्य कन्सिस्टन्सीसाठी हवं तितकं पाणी टाकून मिक्स करा.
- यानंतर गाजर, बीन्स, शिमला मिरची, मटार अशा भाज्या चॉपरमध्ये बारीक करून घ्या.
- तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्या आणि मिरची, आलं-लसूणदेखील टाकू शकता.
- आता या बारीक केलेल्या भाज्या पोहे रव्याच्या बॅटरमध्ये टाका.
- त्यावरून मीठ, साखर, बेकिंग सोडा आणि वरून थोडंसं पाणी घालून एकत्र करा.
advertisement
- आता गॅस सुरु करा आणि त्यावर एक पॅन ठेऊन त्याला तेल लावा.
- पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये पळीने बॅटर टाका आणि हलके पसरवा.
- हे डोश्याइतके पाताळक करू नका, थोडे जाड ठेवा.
- दोनी बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तेल किंवा तूप लावून भाजून घ्या.
advertisement
अशाप्रकारे तुमचा इन्स्टंट डोसा तयार आहे. तुम्ही हा सकाळी नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या नाश्त्याच्यावेळी देखील बनवू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या डोशाच्या निमित्ताने मुलांच्या पोटात भाज्या जातील.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 12:25 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Instant Dosa : सकाळच्या गडबडीतही झटपट होईल नाश्ता, न आंबवता बनवा इन्स्टंट स्पंज डोसा! पाहा रेसिपी









