एक-दोन नव्हे तब्बल 12 लोकं खाऊ शकतात ही थाळी, पण एकट्यानं संपवली तर दिलं जातं मोठं बक्षीस, तुम्हीही व्हाल चकित
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
ही थाळी एक दोन नव्हे तर 12 लोकांना खावी लागते. जर एकट्यानं ही थाळी खाली तर मोठं बक्षीस दिलं जातं.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात. त्यामुळे खवय्ये नेहमी वेगवेगळ्या पदार्थांचा शोध घेतं असतात. अश्याच खवय्यासाठी पुण्यातील जेएम रोड वरील द हाऊस ऑफ पराठा याठिकाणी माहिष्मती थाळी मिळत आहे. ही थाळी एक दोन नव्हे तर 12 लोकांना खावी लागते. जर एकट्यानं ही थाळी खाली तर मोठं बक्षीस दिलं जातं. या थाळीमध्ये 8 प्रकारचे पराठे खवय्यांना खायला दिले जातात.
advertisement
काय आहे थाळीची किंमत?
द हाऊस ऑफ पराठा हॉटेलचे मालक दिनेश गिरी आहेत. त्यांच्या द हाऊस ऑफ पराठा हॉटेलमध्ये माहिष्मती थाळी मिळते. या थाळीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 8 वेगवेगळे प्रकारचे पराठे खायला दिले जातात. या थाळीची किंमत ही 2600 रुपये इतकी आहे.
advertisement
कोणते कोणते मिळतात पराठे?
आलू पालक पराठा, पनीर चीझ पराठा, पनीर पराठा, मेथी पराठा महासेना देवसेना छोटा पराठा, चीझ पराठा, मेथी पराठा अश्या प्रकारचे 8 वेगवेगळे पराठे मिळतात. चायनीज स्टार्टर सोबतच 7 प्रकारचे वेगवेगळे पेय देखील यामध्ये आहेत. लस्सीच्या प्रकारमध्ये मलाई लस्सी, रोज लस्सी, मँगो लस्सी मिळते. अशा प्रकारची थाळी पुण्यात ही कुठेही पाहिला मिळत नाही, अशी माहिती द हाऊस ऑफ पराठाचे मालक दिनेश गिरी यांनी दिली आहे.
advertisement
थाळी पूर्ण खाल्ल्यावर मिळेल बक्षीस
ही थाळी खाण्यासाठी कॉलजेचे मोठे ग्रुप तसेच फॅमिली देखील या ठिकाणी येते. फक्त पुण्यातील लोक नाही तर बाहेर राज्यातून देशातून देखील लोक इथे ही माहिष्मती थाळी खाण्यासाठी येत असतात. तसंच बाहुबली थाळी प्रमाणे ही थाळी एका व्यक्तीनं खाल्ली तर लाईफ टाईमसाठी इथलं फुड हे फ्री आहे. तर 1 लाख 11 हजार रुपये बक्षीस म्हणून रक्कम देखील दिली जाते. त्यामुळे अशी वेगवेगळ्या पदार्थांनी तयार झालेली ही माहिष्मती थाळी खायला तुम्ही नक्कीच जाऊ शकता.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 09, 2024 10:57 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
एक-दोन नव्हे तब्बल 12 लोकं खाऊ शकतात ही थाळी, पण एकट्यानं संपवली तर दिलं जातं मोठं बक्षीस, तुम्हीही व्हाल चकित