घरच्या डाळीला द्या थोडा ट्विस्ट; एवढी भारी होईल की, खाणारे बोटं चाटत राहतील!

Last Updated:

साधी डाळ चांगली लागतेच, पण तिला जरा तडका दिला किंवा जरा नवे प्रयोग केले तर ती आणखी स्वादिष्ट लागू शकते. आपण या टिप्स ट्राय करू शकता.

अशी डाळ खाऊन खवय्ये अगदी तृप्त होतात.
अशी डाळ खाऊन खवय्ये अगदी तृप्त होतात.
भक्ती बिजलानी, प्रतिनिधी
कच्छ : जगभरातले कोणतेही पदार्थ खाल्ले, कितीही पिझ्झा, पास्ता खाल्ला तरी डाळ-भाताला जी गोडी आहे ती कोणत्याच पदार्थाला नाही, असं अनेकजणांचं मत असतं. साधी डाळ चांगली लागतेच, पण तिला जरा तडका दिला किंवा जरा नवे प्रयोग केले तर ती आणखी स्वादिष्ट लागू शकते.
आपण तुरीची, चण्याची, मसूरची अशा वेगवेगळ्या डाळी बनवतो. घराघरातली स्वयंपाकाची पद्धत, मसाले वेगवेगळे असतात, त्यामुळे प्रत्येक घरातल्या डाळीची चवही वेगळी लागते. खरंतर डाळ हा अगदी साधा आणि पटकन होणारा पदार्थ असला तरी त्यातून शरिराला अनेक पोषक तत्त्व मिळतात. खरंतर आपल्या किचनमधल्या प्रत्येक मसाल्यात औषधी गुणधर्म असतात, ते एकदा फोडणीत उतरले की, जेवणातून आपल्या शरिरात जातात.
advertisement
सारखी सारखी डाळ खाऊनही काहीजण कंटाळतात. म्हणूनच डाळ आणखी स्वादिष्ट होण्यासाठी शांती चौहान यांनी काही टिप्स दिल्या आहेत, ज्या वापरून आपण अशी डाळ बनवू शकतो की, खाणारे अगदी बोटं चाटतच राहतील.
कुकरमध्ये जेव्हा आपण डाळ शिजवतो तेव्हा त्याखाली काही मेथीचे दाणे वाफवल्यास डाळीला छान चव येते आणि ही डाळ सहज पचते. आपण डाळीत सहसा तेल वापरतो, पण तेलाच्या जोडीला थोडं तूपही वापरलं, तर डाळीची चव आणखी स्वादिष्ट होते. डाळीत शेवग्याच्या शेंगा असतील तर आहाहा, मग डाळीची मूळ चव तशीच राहते आणि त्यात शेवग्याच्या शेंगांची चव उतरते, ही डाळ खाऊन खवय्ये अगदी तृप्त होतात.
advertisement
डाळ उत्तम होण्यासाठी ती व्यवस्थित शिजणं महत्त्वाचं असतं आणि डाळ तेव्हाच शिजते जेव्हा ती पूर्णपणे भिजते. त्यामुळे सुरूवातील डाळ व्यवस्थित धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावी, तरच ती पूर्णपणे शिजू शकेल. जर डाळ कच्ची राहिली, तर कितीही चांगली फोडणी देऊन ती चवदार होत नाही. शांती यांनी सांगितलं की, डाळीत मसाल्यांसोबत किसलेलं आलं घातलं, तर तिला एक वेगळीच चव येते. आपण या टिप्स ट्राय करू शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
घरच्या डाळीला द्या थोडा ट्विस्ट; एवढी भारी होईल की, खाणारे बोटं चाटत राहतील!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement