फॅट वाढूच देणार नाही असा उपवास; एक एक ग्रॅम वजन होईल कमी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
उपवास म्हणजे फक्त दिवसभर काहीच खायचं नाही किंवा उपवासाचे पदार्थच खायचे असं नाही. तर उपवास असाही असतो, ज्यात आपण ठराविक वेळी जेवण करतो आणि ठराविक वेळ उपाशी राहतो.
आकाश कुमार, प्रतिनिधी
जमशेदपूर : आजकाल लोक आपल्या कामात एवढे व्यस्त असतात की, सर्वात महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष द्यायलाच त्यांच्याकडे वेळ नसतो. ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'हेल्थ' अर्थात 'आरोग्य'. आजकाल पुरेशी झोप, घरचं जेवण मिळत नसल्यामुळे विविध आजार शरिराला जडतात. स्थूलपणा तर आता सामान्य झालाय. अनेकजण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. यावर डायटिशियन सुश्मिता सिंह यांनी एक जबरदस्त उपाय सांगितला आहे, तो म्हणजे उपवास.
advertisement
सुश्मिता सिंह म्हणतात, उपवास म्हणजे फक्त दिवसभर काहीच खायचं नाही किंवा उपवासाचे पदार्थच खायचे असं नाही. तर उपवास असाही असतो, ज्यात आपण ठराविक वेळी जेवण करतो आणि ठराविक वेळ उपाशी राहतो. ज्यामुळे डायटचं एक सायकल मेंटेन राहतं. शिवाय जेवणातूनही फक्त पौष्टिक घटक पोटात जातात, ज्यामुळे उठसूट भूक लागत नाही आणि मेटाबॉलिज्म वाढतं. परिणामी हळूहळू वजन नियंत्रणात येतं. सुरूवातीला महिन्यातून एकदा हा उपवास आपण करू शकता. त्यानंतर शक्य होईल तसे दिवस वाढवावे.
advertisement
नेमकं डायट काय?
- सकाळी उठल्यावर कमीत कमी 3 ते 4 ग्लास पाणी प्यावं. मग सकाळचा नाश्ता 11 वाजता व्हायलाच हवा. त्यात तुम्ही डाळ, चपाती, भाजी, सलाड, दही, मासे, चिकन, अंडी, यापैकी कोणतेही पदार्थ पोटभर खाऊ शकता, ज्यामुळे दिवसभर पोट भरलेलं राहील.
- संध्याकाळी 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान हलका नाश्ता करावा. ज्यात सँडविच, चिकन किंवा वाफवलेलं पनीर खाऊ शकता. चणे आणि राजमाचं सलाडही खाऊ शकता.
- मग रात्रीचं जेवण अतिशय हलकं असायला हवं, तेही 7 वाजण्याच्या आधी. यात डाळ, खिचडी किंवा ओट्स खाऊ शकता, सूप पिऊ शकता. लक्षात घ्या, झोपण्याच्या 3 तास आधी जेवण व्हायला हवं आणि झोपही 7-8 तास व्हायलाच हवी.
- या डायटमुळे संध्याकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत व्यवस्थित उपवास होतो. त्यात सकाळी पोटभर पाणी शरिरात जातं. त्यामुळे पचनसंस्था उत्तम होते आणि पोट साफ होतं. अर्थात शरिरात टाकाऊ घटक न राहिल्यानं फॅट्स तयार होत नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दररोज सकाळी किमान 45 मिनिटं व्यायाम करावा. ही जीवनशैली फॉलो केल्यास आपलं वजन नक्कीच नियंत्रणात येऊ शकतं.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
Jamshedpur,Purbi Singhbhum,Jharkhand
First Published :
August 07, 2024 2:42 PM IST