वाह! रेल्वेत घरच्या जेवणाची सोय होणार, Bigg Boss फेम अभिनेत्रीची भन्नाट आयडिया

Last Updated:

प्रवाशांना पोटभर, चवदार आणि उत्तम दर्जाचं घरचं जेवण मिळावं यासाठी सुप्रसिद्ध रियालिटी शो बिग बॉसची एक्स कन्टेस्टंट राहिलेल्या भारतीय अभिनेत्रीनं पुढाकार घेतलाय.

बिग बॉस गाजवणाऱ्या कलाकारांमध्ये तिचं नाव घेतलं जातं.
बिग बॉस गाजवणाऱ्या कलाकारांमध्ये तिचं नाव घेतलं जातं.
विश्वजीत सिंग, प्रतिनिधी
मुंबई : ट्रेनचा प्रवास हा लाखो प्रवाशांना सोयीचा वाटतो. परंतु अनेक डब्यांमध्ये जेवणाची व्यवस्था नसते. अशात भूक आवरत लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतो. नाहीतर केवळ पोट भरावं यासाठी मिळतील ते पदार्थ विकत घ्यावे लागतात. अशा सर्व प्रवाशांना पोटभर, चवदार आणि उत्तम दर्जाचं घरचं जेवण मिळावं यासाठी सुप्रसिद्ध रियालिटी शो बिग बॉसची एक्स कन्टेस्टंट राहिलेल्या भारतीय अभिनेत्रीनं पुढाकार घेतलाय.
advertisement
बिग बॉस हिंदीचा सीजन 7 गाजवणाऱ्या कलाकारांमध्ये जिचं नाव घेतलं जातं, ती पायल रोहतगी हिनं एका स्टार्टअपसोबत फूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवलंय. त्यांच्या कंपनीचं नाव आहे 'हेल्दी हसल'. क्लाउड किचनसारखं ही कंपनी काम करेल.
प्रवासात मिळेल घरचं अन्न!
पायलने सांगितलं की, तिची कंपनी यासाठीच इतर फूड कंपन्यांपेक्षा वेगळी आहे, कारण याद्वारे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जेवण दिलं जाईल. सुरूवातीला घरी जेवण बनवून पाठवलं जाईल. वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी कंपन्यांद्वारे हे जेवण पोहोचवण्याचं काम होईल. अंधेरी स्टेशनवरून जाणाऱ्या सर्व ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हे घरचं जेवण जेवता येईल.
advertisement
हेल्दी हसलमध्ये केवळ भारतीय जेवण उपलब्ध असेल. त्यामुळे शुद्ध शाकाहारी नाश्ता आणि जेवणाचा प्रवाशांना आस्वाद घेता येईल. यात कांदेपोहे, पराठे, भाजी, खिचडी, पनीर पराठा, पुरी भाजी, इत्यादींचा समावेश असेल. IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation)च्या सहकार्यानं ही कंपनी चालवली जाईल. प्रवासी हेल्दी हसल वेबसाइटवरून जेवण ऑर्डर करू शकतील. हळूहळू आयआरसीटीसीच्या अ‍ॅपवरून जेवण ऑर्डर करण्याची सुविधाही सुरू करण्यात येईल, अशी माहिती मिळाली.
मराठी बातम्या/Food/
वाह! रेल्वेत घरच्या जेवणाची सोय होणार, Bigg Boss फेम अभिनेत्रीची भन्नाट आयडिया
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement