व्हेज खायचं तर थेट इथं यायचं! कांदिवलीतील प्रसिद्ध शॉरमा, शेफ स्पेशल खायला लागते रांग
- Reported by:Sakshi Sushil Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Food: संपूर्ण मुंबईमध्ये प्युअर व्हेज शॉरमाचे हे एकमेव दुकान आहे. इथं तब्बल 20 हून अधिक प्रकारचे शॉरमा मिळतात.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई: शॉरमा हा पदार्थ हल्ली सगळ्यांनाच आवडतो. कांदिवलीमध्ये सुध्दा असेच एक प्रसिद्ध ठिकाण आहे जिथे मिळणारा शॉरमा कांदिवलीकरांच्या पसंतीस उतरलेला आहे. कांदिवली स्टेशन पासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असणारे ‘प्युअर व्हेज शॉरमा’ हे दुकान खवय्यांच्या आवडीचं ठिकाण झालंय. इथे मिळणारा शॉरमा उत्तम चवीचा असून तो खाण्यासाठी खवय्यांची नेहमीच गर्दी असते. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
‘प्युअर व्हेज शॉरमा’ इथे मिळणारी पसंदा स्टाईल फ्रँकी फक्त 180 रुपयांना मिळते. त्यासोबत इथले दुबई स्टाईल, महाराजा स्पायसी, अफगाणी शॉरमा, दुबई प्लेटर असे सगळे पदार्थ मिळतात. इथे मिळणाऱ्या मुघलाई रुमाली रोल्स मध्ये सुद्धा तुम्हाला शाही अफगाणी, पनीर बटर मसाला, चीझी पेशवारी सुद्धा मिळेल. इथे मिळणारा शेफ स्पेशल शॉरमा तर खूप प्रसिद्ध आहे. ज्याची किंमत फक्त 220 रुपये आहे.
advertisement
शेफ स्पेशल शॉरमाला पसंती
“आमच्या इथे शॉरमाचे 20 हून अधिक प्रकार मिळतात. शेफ स्पेशल हा सगळ्यांना खूप आवडतो. कांदिवली मधून अनेक नेहमीचे खवय्ये आमचा व्हेज शॉरमा खाण्यासाठी येतात. या सगळ्या शॉरमा मध्ये आम्ही कधीच बाहेरचे सॉस टाकत नाही,” असे शेफ कुमार यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, संपूर्ण मुंबईमध्ये प्युअर व्हेज शॉरमाचे हे एकमेव दुकान आहे. इथला हायजिन सुद्धा खूप चांगलं ठेवण्यात आलं आहे. यांची स्पेशालिटी म्हणजे इथे मिळणाऱ्या सगळ्या चटण्या आणि सॉसेस या सगळ्या सेल्फ मेड असल्यामुळे यांची टेस्ट कमाल लागते. त्यामुळे आपल्यालाही शॉरमा आवडत असेल तर कांदिवली स्थानकापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या महावीर नगर येथील प्युअर व्हेज शॉरमाला भेट देऊ शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2025 10:19 AM IST
मराठी बातम्या/Food/
व्हेज खायचं तर थेट इथं यायचं! कांदिवलीतील प्रसिद्ध शॉरमा, शेफ स्पेशल खायला लागते रांग





