लॉटरी लागली! बायको, बहीण, गर्लफ्रेंड कुणालाही घेऊन जा! खरेदीच टेन्शनच नाही, मुंबईत मिळतात 195 रुपयांत कुर्ती

Last Updated:

मुंबईमध्ये तुम्हाला जर वेगळ्या प्रकारच्या कुर्ती खरेदी करायच्या असतील तर तुम्हाला 195 रुपयांपासून मिळून जातील. यामध्ये लॉंग कुर्ती, शॉर्ट कुर्ती, प्लाजो सेट असे प्रकार मिळतील.

+
News18

News18

निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई : सध्या अनेक जण कुर्ती घालण्याला प्राधान्य देतात. मुंबईमध्ये तुम्हाला जर वेगळ्या प्रकारच्या कुर्ती खरेदी करायच्या असतील तर तुम्हाला 195 रुपयांपासून मिळून जातील. यामध्ये लॉंग कुर्ती, शॉर्ट कुर्ती, प्लाजो सेट असे प्रकार मिळतील. दादरमधील मनीष मार्केटमध्ये तुम्हाला कमी पैशांमध्ये कपडे विकत मिळतात. इथे विकत मिळणाऱ्या कुर्ती, प्लाजो सेट यांची क्वालिटी मार्केटमध्ये विकत मिळणाऱ्या इतर कपड्यांपेक्षा नक्कीच चांगली असते.
advertisement
दादर रेल्वे स्थानकाला उतरल्यावर तुम्ही फुल मार्केटच्या दिशेने वेस्ट साईडला गेल्यास समोरच मनीष मार्केट दिसेल. इथे कुर्तीची किंमत ही 195 रुपयांपासून सुरू होते. जीन्सवर घालण्यासाठी शॉर्ट कुर्ती, वारली पेंटिंग कुर्ती या सर्वच कुर्ती सध्या ट्रेंडिंग आहेत. या सर्व कुर्ती तुम्हाला इथे 200 ते 300 रुपयांमध्ये मिळून जातील.
advertisement
कॉर्ड सेटची किंमत इथे 550 रुपयांपासून सुरू होते. खादी मटेरियलचा हँडवर्क असलेला कॉर्ड सेट किंवा कश्मीरी स्टाईल कॉर्ड सेट इथे तुम्हाला फक्त 550 रुपयांपासून मिळून जाईल. डेनिम मटेरियलसारखे दिसणारे कुर्ती देखील इथे तुम्हाला उपलब्ध आहेत. या कुर्तीची किंमत साधारण 300 रुपयांपासून आहे.
advertisement
या दुकानाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे विकत मिळणारा माल हा देशभरात सर्वत्र पोहोचवला जातो. तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचे कॉर्ड सेट, कुर्ती विकत घेऊ शकता. मार्केटमध्ये आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ती पाहतो पण इथे तुम्हाला जवळपास 200 पेक्षा अधिक व्हरायटी मिळेल. हे सगळंच काही एका दुकानात मिळून जाईल. मग जर तुम्हाला खूप सारी शॉपिंग करायची असेल किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर दादरमधील मनीष मार्केटच्या पहिला मजल्यावरील शॉप नंबर 68 ला नक्की भेट द्या.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लॉटरी लागली! बायको, बहीण, गर्लफ्रेंड कुणालाही घेऊन जा! खरेदीच टेन्शनच नाही, मुंबईत मिळतात 195 रुपयांत कुर्ती
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement