Success Story : व्यवसाय असावा तर असा, वडापाव विक्रीतून महिन्याला कमवतात 2 लाख नफा, नव व्यावसायिकांना सांगितल्या महत्त्वाच्या टिप्स

Last Updated:

बगाडे यांची या व्यवसायाच्या माध्यमातून दररोज 3 ते साडेतीन हजार वडापावची विक्री होते. यातून त्यांची महिन्याला 6 लाखांची उलाढाल होते.

+
वडापाव

वडापाव सेंटरच्या माध्यमातून राजीव बगाडे यांची महिन्याला 2 लाखांची कमाई ; वडापाव

छत्रपती संभाजीनगर : वाळूज येथील जय भवानी चौकात राजीव बगाडे गेल्या 21 वर्षांपासून अण्णासाई जम्बो वडापाव या नावाचे नाश्ता सेंटर चालवतात. त्यांनी 3 रुपयांपासून वडापाव विक्रीला सुरुवात केली. बगाडे यांची या व्यवसायाच्या माध्यमातून दररोज 3 ते साडेतीन हजार वडापावची विक्री होते. यातून त्यांची महिन्याला 6 लाखांची उलाढाल होते, तर खर्च वजा निव्वळ नफा 2 लाख रुपयांच्या जवळपास मिळतो. या वडापाव सेंटरमध्ये 4 कामगार आहेत, त्यांना देखील रोजगार मिळाल्याने ते समाधानी आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहर, गंगापूर, वाळूज, बजाजनगरसह परिसरातील खवय्ये दररोज अण्णासाई जम्बो वडापाव सेंटरवर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला वडापाव खाण्यासाठी गर्दी करत असतात. वडापाव सेंटरची सुरुवात करताना नवीन व्यावसायिकांनी सर्वात प्रथम स्वच्छता ठेवणे ही बाब महत्त्वाची आहे. तसेच वडापाव तळण्यासाठी तेल वापरण्यात येते त्या तेलाचा दुसऱ्या दिवशी वापर करू नये, ग्राहकांना ऍसिडिटी, जळजळपणा पोट खराब होणे अशा समस्या उद्भवू नये म्हणून ही काळजी घेणे महत्त्वाचे ठरत असल्याचे बगाडे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
वडापाव सेंटरची नवीन सुरुवात कमीत कमी दहा हजार रुपयांपासून करता येते. बगाडे हे देखील सांगतात की, दहा हजार रुपयांमध्ये सर्व काही पद्धतशीररित्या मिळते आणि नाश्ता सेंटरची सुरुवातही होते. वडापावसाठी सर्व मसाले घरगुती तयार केलेले आहेत त्यामध्ये बटाट्याची चटणी, पुदिना चटणी, लसूण चटणी, लाल मिरचीची सुकी चटणी अशा विविध प्रकारच्या मसाल्यांची निर्मिती नैसर्गिकरीत्या ते स्वतः घरी करीत असल्याचे म्हटले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
 Success Story : व्यवसाय असावा तर असा, वडापाव विक्रीतून महिन्याला कमवतात 2 लाख नफा, नव व्यावसायिकांना सांगितल्या महत्त्वाच्या टिप्स
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement